13 हजारांची लाच स्विकारताना पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले

Mumbai Crime Branch arrests Raj Kundra

मुंबई, दि.27(एमएमसी न्यूज नेटवर्क): 13 हजारांची लाच स्वीकारताना देवनार पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली . हरीभाऊ केरुजी बानकर (वय ५४) असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते देवनार पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
तक्रारदार महिलेच्या पतीच्या विरोधात देवनार पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यात तुझ्या पतीला मदत करतो आणि गुन्हयातील नाव कमी करतो असे सांगुन पोलीस निरीक्षक बानकर यांनी तिच्याकडे 25 हजारांची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचून पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर यांना तडजोडीअंती 13 हजारांची लाच स्वीकारताना
रंगेहाथ पकडले. या प्रकरणी एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी नागरिकांना केले आहे.