जे कर्माने मरणार आहेत ,त्यांना धर्माने का मारायचे ? शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे , ते दाखवून द्या

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या निमित्ताने शिवसेनापक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र मधील शिवसेना जिल्हाप्रमुख आणि जिल्हासंपर्कप्रमुख यांना मार्गदर्शन केले . शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे हे दाखवून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी शिवसैनिकांना केले.He appealed to Shiv Sainiks to show that Shiv Sena is different from others.

येणाऱ्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत , आता आघाडीने कोल्हापूरला हिररीने पुढाकार घेतला त्याप्रमाणे एकजूट ठेवा असे आवाहनही त्यांनी केले.
भाजपवर टीकास्त्र सोडताना त्यांनी पश्र्चिम बंगाल चे उदाहरण दिले.भाजपमध्ये एक पध्दत आहे , ते पश्चिम बंगाल, केरळ सारखे आपल्याला हिंदू द्रोही ठरवायचा प्रयत्न करतील,
बंगालचे कर्तृत्व मोठे , यावेळी ममता दिदींनी गेल्या वेळपेक्षा अधिक जागा मिळवल्या. आपण नेहमी म्हणतो महाराष्ट्र दिशा दाखवतो. आता महाराष्ट्राने पुन्हा एकदा दिशा दाखवायची गरज असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

हिंदूं मध्ये फोडाफोड, महाराष्ट्रात मराठी अमराठी, ही भाजपची चाल आहे.संयुक्त महाराष्ट्र समिती कुणी आणि कशी फोडली? मुंबई आपण लढवून मिळवली.We got Mumbai by fighting  ती जनसंघाने फोडली. जागांसाठी ती फोडली. त्यावेळेला जनसंघाने फोडली यांना मराठी हिंदुत्वावर प्रेम नाही. यांना सगळं स्वतः करता हवं आहे. बाळासाहेब म्हणायचे जे कर्माने मरणार त्याला धर्माने काय मारायचे याची आठवण उध्दव ठाकरे यांनी करून दिली.

गट प्रमुख, शाखाप्रमुख हे सगळे पदाधिकारी याद्या मला पाहिजे.
जन्मापासून शिवसेनेकडे नविन तरुण रक्त आहे. गावागावातून शिवसैनिकांकडे सातत्याने लक्ष द्या मग बदल करा. पूर्वी शाखेचे बोर्ड होते, शाखा कार्यालय होते ते बघा, अस करत शिवसेना वाढवायची असा आदेश ही त्यांनी दिला.

शिवसैनिक अंगार आहे त्यामुळे भंगार आपल्याकडे बघणार नाही. फक्त त्यांना भेटून धीर द्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत हे त्याला समजू द्या. गावाची जनतेची कामे सुध्दा त्या गावाची जरुर घेवून घ्या. शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे हे दाखवण्यासाठी शिवसंपर्क अभियान आहे. आता मी फिरणार शस्त्रक्रिया ही धोके पत्करून केली ते तुमच्या सोबत फिरण्यासाठी. आता दौरे करणार दुसरा टप्पा आता सुरु होईल असे सांगत त्यांनी यासाठी शुभेच्छाही दिल्या.Show that Shiv Sena is different from others

ML/KA/PGB

30 Apr 2022