राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा...

अमरावती, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खंजिरी च्या माध्यमातून प्रवचने भजने गाऊन सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा त्यांची जन्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद या गावी पहाटे साडेपाच वाजता पार पडला.Rashtrasant Tukadoji Maharaj’s Birth Anniversary Celebration …

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज Rashtrasant Tukadoji Maharaj यांच्या जन्मोत्सव सोहळ्याला हजारो गुरुदेव भक्तांनी उपस्थिती लावली होती.पहाटे चार वाजता पासुन तुकडोजी महाराजांच्या या जन्मोत्सव सोहळ्याला सुमधूर भजनाने सुरवात झाली होती. तर साडेपाच वाजता तुकडोजी महाराज यांचा पाळणा हलला.मागील सात दिवसापासून यावली शहीद या गावी  तुकडोजी महाराज यांच्या ग्रामजयंती महोत्सवाला प्रारंभ झाला होता.

कोरोना नंतर पहिल्यांदा  तुकडोजी महाराज Rashtrasant Tukadoji Maharaj यांचा जन्मोत्सव सोहळा पार पडत असल्याने दरवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर गुरुदेव भक्तांनी या जन्मोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली होती.या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर देखील उपस्थित होत्या.Minister Yashomati Thakur was also present.

ML/KA/PGB

30 Apr 2022