धानाच्या बोनस साठी आंदोलन …

धानाच्या बोनस साठी आंदोलन ...

नागपूर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्याच्या मागणीसाठी भाजपाचे जिल्हाभर निदर्शने आंदोलन. राज्यात धान उत्पादक शेतकर्‍यांच्या धानाला बोनस देण्याची पद्धत २०१३ सालापासून सुरू होती, परंतू यावर्षी मविआ सरकारने शेतकर्‍यांना बोनसची रक्कम देण्यासाठी अद्यापही शासनस्तरावर कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया अशा धान उत्पादक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. Therefore, injustice is being done to the farmers of grain producing districts like Chandrapur, Gadchiroli, Bhandara and Gondia in Vidarbha. त्यामुळे धान उत्पादक शेतकर्‍यांना त्वरित बोनस देण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने आज जिल्हाभर निदर्शने आंदोलन पार पडले.

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे Devrao Bhongale यांच्या नेतृत्वात चंद्रपूरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने देत आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने उप जिल्हाधिकारी अश्विनी मांजे यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना मागणीचे निवेदन पाठविले. राज्यामध्ये २०१३ पासून शेतकर्‍यांच्या धानाला बोनस दिल्या जाते. मागील पाच वर्षांतही भाजपा सरकारने हे बोनस दिले. परंतू जनमताचा अवमान करून सत्तेत आलेल्या या विश्वासघाती मविआ सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे म्हणून आज जिल्हाभर निदर्शने आंदोलन करण्यात आलेMovement for grain bonus …

ML/KA/PGB

25 Mar 2022