कोविड लशीचा बूस्टर डोस ओमायक्रॉन विरूद्ध प्रभावी

Third Dose Provides Effective Antibodies Against Omicron

लंडन, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बहुचर्चित पत्रिका ‘द लॅन्सेट’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, कोविड-19 लशीचा तिसरा डोस (third dose) घेतल्याने शरीरातील अँटीबॉडीजची (antibodies) पातळी वाढते, जी कोरोना विषाणुच्या ओमायक्रॉन (omicron) प्रकाराला प्रभावीपणे निष्प्रभ करु शकते.

फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूट आणि ब्रिटनच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्च (NIHR) च्या संशोधकांना असे आढळून आले की ज्यांनी ऍस्ट्राझेनेका किंवा फायझर लशींचे केवळ दोन डोस घेतले होते त्यांच्या्मध्ये ओमायक्रॉनला (omicron) निष्प्रभ करण्यासाठी सक्षम अँटीबॉडी (antibodies) नव्हत्या.

त्यांना असेही आढळून आले की दुसरा डोस घेतल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत अँटीबॉडीची (antibodies) पातळी कमी झाली, परंतु तिसऱ्या ‘बूस्टर’ डोसने (third dose) अँटीबॉडीची पातळी वाढवली, ज्यामुळे ओमायक्रॉन संसर्ग प्रभावीपणे निष्प्रभ झाला.

संशोधनात असे आढळून आले की ज्या लोकांनी फायझर लशीचे तीनही डोस घेतले त्यांच्यामध्ये तिसरा डोस (third dose) घेतल्यानंतर ओमायक्रॉन (omicron) विरोधी अँटीबॉडीची पातळी, डेल्टा प्रकारा विरोधात दोन डोस घेतल्यानंतर जेवढी होती तेवढीच होती.

एकूणच, संशोधकांच्या म्हणण्यानुसार, तीन डोस घेतल्यानंतर ओमायक्रॉनच्या विरूद्ध ऍन्टीबॉडीजची पातळी दोन डोस घेण्याच्या तुलनेत सुमारे 2.5 पट जास्त होती.

According to a study published in the popular journal The Lancet, taking a third dose of the Covid-19 vaccine increases the body’s levels of antibodies, which can effectively neutralize the omicron variant of corona virus.

PL/KA/PL/21 JAN 2022