अब्जाधीश एलन मस्क यांनी आतापर्यंत अंतराळात सोडले 2000 उपग्रह

Spacex Fires Its 2000th Starlink Satellite

वॉशिंग्टन, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मंगळावर शहर वसवण्याचे स्वप्न पाहणारे स्पेसएक्सचे (Spacex) मालक एलन मस्क आपल्या स्टारलिंक उपग्रहांच्या (Starlink Satellite) सहाय्याने संपूर्ण अंतराळ जोडू इच्छित आहेत. मस्क यांच्या कंपनीने आतापर्यंत 2000 उपग्रह अंतराळात सोडले आहेत. एलन मस्क यांची एकूण 42,000 उपग्रह अंतराळात सोडण्याची योजना आहे. मंगळवारी, स्पेसएक्सने फाल्कन 9 रॉकेटच्या मदतीने 49 स्टारलिंक उपग्रह अंतराळात सोडले. या उपग्रहांच्या मदतीने एलन मस्क जगभरात इंटरनेट सेवा सुरू करणार आहेत.

स्पेसएक्सने (Spacex) ट्विटरवर 49 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्याची घोषणा केली. असे सांगितले जात आहे की प्रत्येक स्टारलिंक उपग्रह (Starlink Satellite) आकाराने एका टेबलसारखा आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 2,042 उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात आले आहेत. यातील अनेक खराबही झाले आहेत. स्टारलिंक उपग्रहांचा एक समूह आहे ज्याचा उद्देश जगाच्या बहुतांश भागांसाठी इंटरनेटचा पुरवठा करणे आहे. यात विशेष करुन ग्रामीण भाग आहेत ज्याठिकाणी वेगवान इंटरनेट अद्याप पोहोचलेले नाही.

एलन मस्क यांनी आतापर्यंत जगातील 23 देशांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर इंटरनेट सेवा सुरू केली आहे. एलन मस्क यांचा अंदाज आहे की पुढच्या पिढीतील स्टारलिंक उपग्रहांचा (Starlink Satellite) समूह 42 हजार पर्यंतचा असू शकतो जो पृथ्वीच्या खालच्या कक्षेत असेल. स्पेसएक्सला (Spacex) पुढील काही वर्षांत 12000 स्टारलिंक उपग्रह पाठवण्याची परवानगी आहे. त्याचवेळी त्यांना 42 हजार उपग्रहांची यंत्रणा तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाकडून परवानगी मिळणे अपेक्षित आहे.

एलन मस्क यांची आता भारतासह संपूर्ण जगाच्या दूरसंचार उद्योगावर नजर आहे. स्पेसएक्सने गुंतवणूकदारांना सांगितले की स्टारलिंकची नजर इन-फ्लाइट इंटरनेट, सागरी सेवा, भारत आणि चीनमधील मागणी आणि ग्रामीण ग्राहकांवर आहे. ही संपूर्ण बाजारपेठ एक ट्रिलियन डॉलरची आहे. स्पेसएक्स स्टारलिंक प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात इंटरनेट सेवा देण्याची योजना तयार करत आहे. आता एलन मस्क यांना 100 एमबीपीएस उपग्रह आधारित इंटरनेट सेवेद्वारे वेगाने वाढणाऱ्या भारतीय दूरसंचार उद्योगात आपले नशीब आजमावायचे आहे.

एलन मस्क यांनी भारत सरकारला देशात उपग्रह आधारित इंटरनेट सेवा देण्यासाठी परवानगी देण्याची विनंतीही केली आहे. भारतात ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी ट्रायने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एक सल्लापत्र जारी केले होते. त्याच्या उत्तरात स्पेसएक्सच्या सॅटेलाइट गव्हर्नमेंट अफेयर्स पॅट्रिशिया कूपर यांनी सांगितले की, स्टारलिंकच्या हाय-स्पीड सॅटेलाइट नेटवर्कद्वारे भारतातील सर्व लोकांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीने जोडण्याचे ध्येय साध्य करण्यात मदत होईल.

SpaceX owner Alan Musk, who dreams of building a city on Mars, wants to connect the entire space with his Starlink satellites. Musk’s company has so far launched 2,000 satellites. Alan Musk plans to launch a total of 42,000 satellites into space. On Tuesday, SpaceX launched 49 Starlink satellites into space with the help of Falcon 9 rockets.

PL/KA/PL/21 JAN 2022