अमेरिकेच्या युद्धनौकेचे चीनच्या दक्षिण चीन समुद्रातील दाव्याला आव्हान

South China Sea Latest news

वॉशिंग्टन, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दक्षिण चीन समुद्रातील (South China Sea) चीनच्या प्रादेशिक दाव्यांबाबतचा वाद संपताना दिसत नाही. अमेरिकेच्या एका युद्धनौकेने गुरुवारी दक्षिण चीन समुद्रातील सार्वभौमत्वाच्या चीनच्या दाव्यांना आव्हान दिले आणि म्हटले की असे दावे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करतात आणि समुद्राच्या स्वातंत्र्याला गंभीर धोका निर्माण करतात.

अमेरिकन नौदलाच्या 7 व्या ताफ्याने एका निवेदनात म्हटले आहे की 20 जानेवारीला यूएसएस बेनफोल्ड (DDG 65) ने आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार पॅरासेल बेटांच्या परिसरात नौवहन अधिकार आणि स्वातंत्र्यावर भर दिला होता. संचलनाच्या शेवटी, यूएसएस बेनफोल्डने चीनचा अवाजवी दावा फेटाळला होता आणि दक्षिण चीन समुद्रात आपले संचलन सुरु ठेवले.

निवेदनानुसार, दक्षिण चिनी समुद्रातील (South China Sea) बेकायदेशीर आणि व्यापक सागरी दाव्यांमुळे समुद्राच्या स्वातंत्र्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे, ज्यामध्ये नेव्हिगेशन आणि ओव्हरफ्लाइटचे (एखाद्या विशिष्ट क्षेत्रात विमानाचे उड्डाण) स्वातंत्र्य, मुक्त व्यापार आणि अव्याहत व्यापार आणि दक्षिण चीन समुद्र किनारी देशांसाठी आर्थिक संधीचे स्वातंत्र्य यांचा समावेश आहे.

चीन, तैवान आणि व्हिएतनाम हे देश पॅरासेल बेटांवर सार्वभौमत्वाचा दावा करतात. म्हणून जेव्हा जेव्हा एखादे लष्करी जहाज एखाद्या प्रादेशिक समुद्रातून ‘निर्दोष मार्गा’मध्ये प्रवेश करते, तेव्हा तीनही दावेदारांकडून एकतर परवानगी घ्यावी लागते किंवा आगाऊ सूचना देणे आवश्यक असते. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, सर्व देशांच्या जहाजांना त्यांच्या युद्धनौकांसह – प्रादेशिक समुद्रातून ‘निर्दोष मार्गाने’ स्वतंत्र वाहतुकीचा आनंद घेण्याचा अधिकार असतो.

दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेन नौदलाच्या संचलनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, चीनच्या सरकारी माध्यमाने म्हटले आहे की पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ने दक्षिण चीन समुद्रात (South China Sea) चीनच्या जलक्षेत्रात शिरलेल्या अमेरिकन युद्धनौकेला बाहेर काढले. अमेरिकेच्या युद्धनौकेच्या उपस्थितीवर चीनने तिखट प्रतिक्रिया दिली की ते ज्याचा दावा करतात ते त्यांचे जलक्षेत्र आहे. चीनच्या लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की पीएलए सदर्न थिएटर कमांडने इशार्‍यासह विनाशकाचा मागोवा घेण्यासाठी, निरीक्षण करण्यासाठी आणि पळवून लावण्यासाठी नौदल आणि हवाई दलाचा वापर केला.

चीन जवळजवळ संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर आपले सार्वभौम क्षेत्र असल्याचा दावा करतो. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशातील बीजिंगच्या अनेक दाव्यांना आव्हान देणार्‍या दक्षिण चीन समुद्राच्या दाव्यांबाबतचा एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला होता.

The dispute over China’s territorial claims in the South China Sea does not seem to be over. A U.S. warship on Thursday challenged China’s claims to sovereignty in the South China Sea, saying such claims violate international law and pose a serious threat to maritime independence.

PL/KA/PL/21 JAN 2022