लष्करी शस्त्रनिर्मितीत भारत झाला स्वावलंबी

India is self-sufficient in military weapons

नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे सकारात्मक परिणाम एका नवीन अहवालात समोर आले आहेत. या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, भारत (India) लष्करी शस्त्रे (military weapons) बनवण्यात स्वावलंबी होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे आणि यामुळेच जगातील अव्वल 100 कंपन्यांमध्ये तीन भारतीय कंपन्याही सामील झाल्या आहेत. या कंपन्यांनी शस्त्रे, लष्करी विमाने आणि उपकरणे बनवणाऱ्या अव्वल 100 जागतिक कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. स्वीडिश वैचारिक समूह स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अहवालात याचा उल्लेख करण्यात आला आहे.

 

‘मेक इन इंडिया’ अंतर्गत जगभरातील लष्करी शस्त्रे (military weapons) बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये भारताचा (India) दबदबा वाढल्याचे या अहवालात म्हटले आहे. पहिल्या 100 कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्यात तीन भारतीय कंपन्यांनाही यश आले आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स (42व्या क्रमांकावर) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स (66व्या क्रमांकावर) यांच्या शस्त्र विक्रीत अनुक्रमे 1.5 टक्के आणि 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तथापि, 2020 मध्ये भारतीय शस्त्रनिर्मिती कारखान्यांच्या (60 व्या क्रमांकावर) शस्त्र विक्रीत किरकोळ (0.2 टक्के) वाढ झाली आहे.

 

अहवालात म्हटले आहे की भारतीय (India) कंपन्यांची एकूण शस्त्र विक्री 6.5 अब्ज डॉलर (सुमारे 48,750 कोटी रुपये) आहे, जी 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 1.7 टक्क्यांनी जास्त होती. एवढेच नाही तर हा आकडा अव्वल 100 कंपन्यांच्या एकूण विक्रीच्या 1.2 टक्के आहे. 2020 मध्ये, मोदी सरकारने देशांतर्गत कंपन्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि शस्त्रास्त्रांच्या उत्पादनात स्वावलंबन वाढवण्यासाठी शंभरहून अधिक प्रकारच्या लष्करी शस्त्रांच्या आयातीवर टप्प्याटप्प्याने बंदी घालण्याची घोषणा केली होती.

 

अन्य देशांबद्दल बोलायचे झाले तर, चीन आता लष्करी शस्त्रे (military weapons) आणि उपकरणे बनवण्यात अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2020 मध्ये अव्वल 100 मधील पाच चिनी कंपन्यांची एकत्रित शस्त्रास्त्र विक्री अंदाजे 66.8 अब्ज डॉलर एवढी होती, जी 2019 च्या तुलनेत 1.5 टक्क्यांनी वाढली आहे. अहवालानुसार, अव्वल 100 शस्त्रास्त्र विक्रीमध्ये 13 टक्के हिस्सेदारीसह चीनच्या कंपन्यांची एकून शस्त्र विक्री 2020 मध्ये अमेरिकन कंपन्यांपेक्षा कमी आणि ब्रिटीश कंपन्यांपेक्षा जास्त होती.

 

The positive results of Prime Minister Narendra Modi’s ‘Make in India’ campaign have come to light in a new report. According to the report, India is fast moving towards becoming self-sufficient in military weapons, which is why three Indian companies have joined the top 100 companies in the world.

PL/KA/PL/07 DEC 2021