NPCIL मध्ये 107 शिकाऊ पदांसाठी भरती 

OTT-platform

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे शिकाऊ उमेदवारांच्या एकूण 107 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट- npcilcareers.co.in ला भेट द्यावी लागेल. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने जारी केलेल्या नोटीसनुसार, अर्जाची प्रक्रिया 28 ऑक्टोबर 2021 पासून सुरू झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.Recruitment for 107 apprenticeships in NPCILv
तारीख
ऑनलाइन अर्जाची सुरुवातीची तारीख – 28 ऑक्टोबर 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ नोव्हेंबर २०२१ दुपारी ४ वाजेपर्यंत
पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित आयटीआय पास असणे आवश्यक आहे.Recruitment for 107 apprenticeships in NPCIL
वय श्रेणी
उमेदवारांची वयोमर्यादा 14 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावी. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे आणि PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी 10 वर्षे वयाची सूट असेल.
निवड प्रक्रिया
ITI मधील सर्व सेमिस्टरमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवडीपूर्वी सर्व उमेदवारांनी कौशल्य विकास आणि उद्योजकता या वेब पोर्टलवर नोंदणी करणे देखील आवश्यक आहे.
पगार
NPCIL ने जारी केलेल्या नोटिसनुसार, एक वर्षाचा ITI कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारांना दरमहा 7,700 रुपये आणि दोन वर्षांचा ITI कोर्स पूर्ण करणाऱ्यांना 8,855 रुपये प्रति महिना मिळतील.Recruitment for 107 apprenticeships in NPCIL
ML/KA/PGB
10 Nov 2021