परमविरसिंह व सचिन वाझे भेटीमागे कोण? चौकशी करा

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंह व सचिन वाझे Paramvir Singh and Sachin Waze हे चांदिवाल कमिशनसमोर चौकशीला जाण्यापूर्वी भेटले अशी माहिती मिळतेय हे नियमाला धरुन नाही. चौकशीला जाणारे दोन व्यक्ती वा आरोपी अशा प्रकारे भेटू शकत नाहीत अशी नियमावली आहे. मग अशा परिस्थितीत ते दोघे का भेटले? कशासाठी भेटले? याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे  Atul Londhe यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना लोंढे म्हणाले की, परमवीरसिंह व सचिन वाझे Paramvir Singh and Sachin Waze हे दोघेही अनेक प्रकरणात आरोपी आहेत. आणि अशा पद्धीतीने दोन आरोपीमध्ये चर्चा होणे गंभीर आहे, यामुळे चौकशीमध्ये बाधा पोहचू शकते. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची घटना कधी घडली नाही. जर असं झालं असेल तर याची खोलात जाऊन चौकशी झाली पाहिजे. परमवीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यामध्ये काय चर्चा झाली? त्यांच्या भेटीमागे कोण आहे ? त्यात काय कट शिजला? हे जनतेच्यासमोर आलं पाहिजे असे लोंढे म्हणाले.

ML/KA/PGB

29 Nov 2021