कोरोनाचा संसर्ग रोखण्यास सामाजिक अंतर पुरेसे नाही

Social Distancing is Not enough for corona virus infection
National

लंडन, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणू (corona virus) संसर्गाबाबत एक नवीन संशोधन समोर आले आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या अभियंत्यांनी केलेल्या या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक अंतर (Social Distancing) पुरेसे नाही. यासोबतच, संशोधनात असेही म्हटले आहे की, एका बंदिस्त ठिकाणी बसलेली कोरोना संक्रमित व्यक्ती दोन मीटर अंतरावरही दुसऱ्याला संक्रमित करू शकते.

केंब्रिज विद्यापीठातील अभियंत्यांच्या एका पथकाने लोक खोकल्यावर लहान थेंब कसे पसरतात हे निर्धारित करण्यासाठी संगणक मॉडेलचा वापर केला. त्यांना आढळले की मास्क नसण्याच्या स्थितीत कोविड-19 ग्रस्त व्यक्ती बंद जागेत आणि बाहेर देखील दोन मीटर अंतरावर असलेल्या एखाद्या व्यक्तीला संक्रमित करू शकते. ब्रिटनमध्ये या अंतराचा वापर केला जात आहे.

संशोधकांना असेही आढळून आले की खोकण्याचा परिणाम मोठ्या परिसरात होतो आणि सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणानुसार तथाकथित ‘सुरक्षित’ अंतर एक ते तीन मीटर किंवा त्याहून अधिक असू शकते. ‘फिजिक्स ऑफ फ्लुइड्स’ पत्रिकेमध्ये या आठवड्यात प्रकाशित झालेल्या संशोधनाचे पहिले लेखक भारतीय वंशाचे डॉ. श्रेय त्रिवेदी यांनी सांगितले की, या आजाराच्या प्रसाराचा एक भाग विषाणूशास्त्राशी संबंधित आहे, म्हणजेच तुमच्या शरीरात किती विषाणू आहेत, तुम्ही बोलताना किंवा खोकताना किती विषाणूजन्य घटक बाहेर टाकता.

संशोधनाचा सारांश असा आहे की सामाजिक अंतर (Social Distancing) हा कोरोना विषाणूचा (corona virus) प्रभाव कमी करण्याचा उपाय नाही आणि विशेष करुन ते येत्या हिवाळ्यात लसीकरण, हवेची योग्य हालचाल आणि मास्क यांचे सतत महत्त्व अधोरेखित करते.

त्याच वेळी, अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या संशोधनात असे म्हटले आहे की मुख्यतः लोकांना श्वासोच्छवासातील द्रवपदार्थामुळे संसर्ग होतो, ज्यामध्ये संसर्ग करण्यास सक्षम असलेला विषाणू असतो. बंदिस्त जागेत आणि खराब वायुवीजन असलेल्या ठिकाणी एरोसोल दीर्घकाळ हवेत तरंगत रहातात आणि हवेत एक मीटरपेक्षा जास्त अंतर हवेत तरंगून ते लोकांना संक्रमित करु शकतात. यासाठीच सीडीसी मार्गदर्शक तत्त्वे बंद घरातील लोकांना मास्क तसेच सामाजिक अंतर (Social Distancing) आणि योग्य वायुविजनाकडे लक्ष देण्यावर भर देतात.

New research on corona virus infection has emerged. The research, conducted by engineers at Cambridge University, claims that social distance is not enough to prevent the spread of the corona virus. In addition, research has shown that a person infected with corona sitting in a confined space can infect another at a distance of up to two meters.

PL/KA/PL/26 NOV 2021