भारत चीन बैठक निष्कर्षाविना

कच्च्या तेलाच्या उत्पादन कपातीवरुन युएई आणि ओपेक यांच्यात संघर्ष

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत (India) आणि चीन (China) यांच्यातील कोर कमांडर स्तरावरील 13 वी बैठक (Meeting) 10 ऑक्टोबर 2021 रोजी चुशुल-मोल्दो सीमेवर आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान दोन्ही देशांमधील चर्चा पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसह (LAC) उर्वरित समस्या सोडवण्यावर केंद्रित होती. भारताने चीनला सांगितले की प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती चीनने सद्यस्थिती बदलण्याच्या आणि द्विपक्षीय करारांचे एकतर्फी उल्लंघन करण्याच्या प्रयत्नांमुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे चीनने उर्वरित भागात योग्य पावले उचलावित जेणेकरून पश्चिम क्षेत्रातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित होईल.
भारताने (India) सांगितले की हे दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांच्या दुशान्बे येथील नुकत्याच झालेल्या बैठकीत (Meeting) दिलेल्या मार्गदर्शनाशी सुसंगत असेल, त्याठिकाणी दोन्ही देशांनी उर्वरित समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात यावर सहमती दर्शविली होती.
भारताने यावर भर दिला की उर्वरित क्षेत्रांवरील तोडग्यामुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये प्रगती होईल. बैठकीदरम्यान, भारतीय बाजूने उर्वरित क्षेत्रांचे निराकरण करण्यासाठी विधायक सूचना करण्यात आल्या परंतु चीन (China) त्यावर सहमत नव्हता आणि कोणतेही दूरगामी प्रस्तावही देऊ शकला नाही. अशा प्रकारे बैठकीत (Meeting) उर्वरित क्षेत्रांवर कोणताही निर्णय झाला नाही.
दोन्ही बाजूंनी दळणवळण सुरु ठेवण्यासाठी आणि स्थैर्य राखण्यासाठी सहमती दर्शवण्यात आली आहे. भारताने (India) सांगितले की, आम्हाला आशा आहे की चीन द्विपक्षीय संबंधांचा एकूण दृष्टीकोन विचारात घेईल आणि द्विपक्षीय करार आणि राजशिष्टाचाराचे पूर्ण पालन करून उर्वरित समस्यांचे लवकर निराकरण करण्याच्या दिशेने कार्य करेल.
त्याच वेळी, चीन (China) या बैठकीसंदर्भात (Meeting) एक वेगळाच राग आळवत आहे. चीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने पीएलए वेस्टर्न थिएटर कमांडचा संदर्भ देत म्हटले आहे की यावेळी भारताने अयोग्य आणि अवास्तव मागण्यांवर जोर दिला होता. भारताने चर्चेत अडचणी निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
 
The 13th Corps Commander Level Meeting between India and China was held on 10 October 2021 at the Chushul-Moldo border. Discussions between the two countries during the meeting focused on resolving the remaining issues along the Line of Actual Control (LAC) in East Ladakh. India told China that the situation along the Line of Control (LoC) was created by China’s efforts to change the status quo and unilaterally violate bilateral agreements.
PL/KA/PL/11 OCT 2021