चिपी विमानतळावर वाजल्या फटाक्यांच्या लडी

जम्मू-काश्मीरमध्ये सात जागा वाढणार

सिंधुदुर्ग, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणाच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उदघाटन आज झाले Airport in Sindhudurg district, which promotes Konkan tourism, was inaugurated today मात्र यावेळी झालेल्या राजकीय आरोपांच्या फैरीत जोरदार फटाके वाजल्याचे पाहायला मिळाले .
बहुचर्चित ठरलेल्या चिपी विमानतळाचे उद्घाटन अखेर आज थाटात झाले The much talked about Chippi Airport was finally inaugurated today, विमानतळावर आधी शासकीय विमानातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मंत्री उतरले , त्यापाठोपाठ अलायन्स एयरलाईन्स ने केंद्रीय मंत्री नारायण राणे , रामदास आठवले आदी मंत्रीगण आले , प्रवासी कोकणी माणूस ही यातूनच आला , विमानतळावर आज एकूण चार विमाने उतरली .A total of four planes landed at the airport today.
व्यासपीठावर ठाकरे आणि राणे शेजारीच बसले Thackeray and Rane sat side by side on the stage होते मात्र दोघांत कोणताही संवाद झाला नाही , भाषणात मात्र राणे यांनी सूत्रसंचालन करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार आक्षेप घेत हा सरकारी कार्यक्रम आहे की पक्षाचा अशी विचारणा केली . विमानतळ , सी वर्ल्ड या प्रकल्पाला जोरदार विरोध करणारे आज इथे मिरवत आहेत असा टोला त्यांनी लगावला तो थेट राऊत यांच्याकडे हात दाखवूनच . इथल्या गोष्टी तुमच्यापर्यंत काय पोहोचतात ते पहा किंवा त्यासाठी स्वतंत्र माणूसच ठेवा असे असा अनाहूत सल्ला राणे यांनी ठाकरेंना दिला .Rane gave this kind of advice to Thackeray.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री ठाकरे Chief Minister Thackeray यांनी राणे यांच्या आरोपांची दखल घेत त्यांच्यावर प्रतिहल्ला चढवला , बाळासाहेबांना खोटं चालत नसे म्हणूनच त्यांनी काही लोकांची पक्षातून हकालपट्टी केली असे सांगत राऊत यांनाच इथल्या जनतेने निवडून दिले आहे याची आठवण ही राणे यांना करून दिली , मात्र आजचा दिवस हा आदळआपट करण्याचा नाही असे सांगत त्यांनी इथल्या पर्यटन आणि विकासावर थोडे भाष्य केले .
केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे Minister Jyotiraditya Shinde यांनी आपल्या हिंदी मिश्रित मराठीत भाषण करून सगळ्यांना सुखद धक्का दिला आणि आपली नाळ महाराष्ट्राशी जोडली असल्याचे दाखवून दिले . येत्या पाच वर्षात चिपी वर देशभरातून 20 ते 25 विमाने आणण्याचा आपला प्रयत्न असेल असे त्यांनी सांगितले . सध्या या विमानतळावर फक्त मुंबईहून एकच विमान दिवसाला जाणार असून एकूण एक तास पाच मिनिटांत सिंधुदुर्गात पोहोचवणार आहे , तेच विमान पुन्हा मुंबईत परतणार आहे .The same plane will return to Mumbai again.
ML/KA/PGB
9 Oct 2021