चर्चेच्या आडून चीनची युद्धाची तयारी?

OTT-Debut

बिजिंग, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत (India) – चीन (China) सीमेवरील गलवान खोऱ्यात हिंसक चकमक झाल्यापासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) अस्वस्थ शांतता पसरली आहे. सीमेवरून सैन्य हटवण्यासाठी दोन्ही देशांमधील लष्करी आणि मुत्सद्दी स्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्याही झाल्या आहेत. त्यानंतरही दोन्ही देशांचे सैन्य अनेक ठिकाणी समोरासमोर उभे ठाकलेले आहेत.
दरम्यान, चीनने भारतासोबत चर्चेच्या आडून सीमेवर 100 हून अधिक प्रगत रॉकेट लाँचर तैनात केले आहेत. एवढेच नाही तर चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) 155 मिमी कॅलिबर पीसीएल-181 स्वयंचालित हॉविट्जर देखील तैनात केला आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने आपल्या वृत्तात चिनी सैन्याच्या जवळच्या एका स्रोताच्या हवाल्याने म्हटले आहे की, चीनने (China) भारतालगतच्या (India) त्याच्या उंचावरच्या सीमेवर 100 पेक्षा जास्त प्रगत लांब पल्ल्याचे रॉकेट लाँचर तैनात केले आहेत. सूत्रांनी सांगितले की, पीपल्स लिबरेशन आर्मी हिमालयातील रक्त गोठवणार्‍या हिवाळ्यासाठी तयारी करत आहे. ही तैनाती एम777 अल्ट्रा-लाइट हॉविट्झरसह भारतीय लष्कराच्या तीन रेजिमेंटच्या तैनातीला प्रत्युत्तरादाखल बाचाव म्हणून करण्यात आली आहे.
चीनने (China) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) पीएचएल-03 लाँग-रेंज मल्टीपल रॉकेट लॉन्चर प्रणाली तैनात केली आहे. चीनचे प्रसारमाध्यम सीसीटीव्हीच्या वृत्तानुसार, नवीन पीएचएल-03 मल्टीपल रॉकेट लाँचरच्या 10 युनिट्स लडाखजवळ तैनात करण्यात आल्या आहेत. प्रत्येक युनिटमध्ये चार क्रू मेंबर्स आहेत. यात प्रत्येकी 300 मिमीच्या 12 लाँचर ट्यूब आहेत. त्याचे रॉकेट 650 किमी अंतरापर्यंत हल्ला करण्यास सक्षम आहेत. त्याचे 12 मीटर लांब रॉकेट ताशी 60 किलोमीटर वेगाने उडतात.
चीनने (China) भारतीय (India) सीमेवर टाईप पीसीएल -191 रॉकेट लाँचर देखील तैनात केले आहेत. हे चीनच्या एआर 3 प्रणालीच्या आधारे विकसित करण्यात आले आहेत. चीनच्या प्रकार पीसीएल-191 ची मल्टीपल लॉन्च रॉकेट सिस्टीम (MLRS) 1 ऑक्टोबरला चीनच्या राष्ट्रीय दिनाच्या संचलनामध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. या रॉकेट सिस्टीमची क्षमता 350 किमी असल्याचे सांगितले जात आहे. ही मॉड्यूलर रॉकेट प्रणाली आठ 370 मिमी रॉकेट डागू शकते.
वृत्तात असे म्हटले आहे की चीनी सैन्याने 100 पेक्षा जास्त पीसीएल-181 ट्रक माऊंट होवित्झर देखील तैनात केले आहेत. चीनचा दावा आहे की त्याच्या पीसीएल-181 होवित्झरची मारा करण्याची क्षमता एम777 च्या दुप्पट आहे. 155 मिमी कॅलिबर पीसीएल-181 सेल्फ प्रोपेल्ड होवित्झर लडाखच्या परिसरात तैनात करण्यात आले आहे. चिनी प्रसारमाध्यमांचा दावा आहे की काही दिवसांपूर्वी त्याचीही एक सुधारित आवृत्ती लडाखजवळ तैनात करण्यात आली आहे. हे होवित्झर 122 मिमी-कॅलिबर असल्याचे म्हटले जाते.
The Line of Actual Control (LAC) has been in turmoil since a violent clash in the Galvan Valley on the India-China border. There have also been several rounds of talks at the military and diplomatic levels between the two countries to remove troops from the border. Even after that, the armies of both the countries are facing each other in many places.
PL/KA/PL/20 OCT 2021