बँकांच्या अनुत्पादित मालमत्तांवर क्रिसिलचे काय आहे मत ?

OTT-Debut

नवी दिल्ली, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बँकांच्या अनुत्पादित मालमत्ता (NPA) म्हणजेच थकित कर्जे चालू आर्थिक वर्षात वाढून 8 ते 9 टक्के होण्याचा अंदाज आहे. पत निर्धारण करणारी संस्था क्रिसिलने (CRISIL) ही माहिती दिली. पीटीआयच्या वृत्तानुसार, जर असे झाले, तर ते 2017-18 या आर्थिक वर्षाच्या अखेरीच्या 11.2 टक्क्यांच्या आकडेवारीपेक्षा खूपच कमी असेल. क्रिसिलच्या मते, कर्ज पुनर्रचना आणि आपत्कालीन कर्ज सुविधा हमी योजना (ईसीएलजीएस) सारख्या कोविड -19 मदत उपाययोजनांमुळे बँकांच्या एकूण अनुत्पादित मालमत्ता मर्यादित ठेवण्यास मदत होईल.
 
वृत्तानुसार, क्रिसिलने (CRISIL) म्हटले आहे की चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या अखेरीस सुमारे दोन टक्के बँक कर्जाची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत, एकूण अनुत्पादित मालमत्ता (NPA) आणि पुनर्रचने अंतर्गत येणार्‍या कर्जासह दबावग्रस्त मालमत्ता 10 ते 11 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. क्रिसिलचे वरिष्ठ संचालक आणि उपमुख्य पतमानांकन अधिकारी कृष्णन सीतारामन यांनी अहवालात म्हटले आहे की किरकोळ आणि एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) विभागाचे योगदान एकूण कर्जाच्या सुमारे 40 टक्के आहेत. यावेळी या क्षेत्रांमध्ये अनुत्पादित मालमत्ता आणि दबावग्रस्त मालमत्ता वाढण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस या दोन विभागांमधील तणावग्रस्त मालमत्ता वाढून अनुक्रमे 4 ते 5 टक्के आणि 17 ते 18 टक्के होण्याचा अंदाज आहे.
क्रिसिलने (CRISIL) सांगितले आहे की, राष्ट्रीय संपत्ती पुनर्रचना कंपनी लि. (NARCL) चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस कार्यान्वित झाल्यामुळे, पहिल्या फेरीत 90,000 कोटी रुपयांच्या अनुत्पादित मालमत्तांची (NPA) विक्री अपेक्षित आहे. यामुळे सकल अनुत्पादित मालमत्तांच्या माहितीमध्ये घट पहायला मिळू शकते. वृत्तानुसार कॉर्पोरेट क्षेत्र जास्त मजबूत आहे. पाच वर्षांपूर्वी मालमत्तेच्या गुणवत्तेच्या पुनरावलोकनादरम्यान कंपन्यांमधील बहुतेक दबावग्रस्त मालमत्तांची ओळख आधीच पटवण्यात आली आहे.
वृत्तात म्हटले आहे की यामुळे कंपन्यांच्या खातेपुस्तिका मजबूत झाल्या आणि त्या किरकोळ आणि एमएसएमईच्या तुलनेत साथीच्या आव्हानांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकल्या, त्यामुळेच या विभागातील केवळ एक टक्के कर्जाची पुनर्रचना झाली आहे. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील दबावग्रस्त मालमत्ता चालू आर्थिक वर्षात 9 ते 10 टक्के राहण्याची शक्यता आहे.
Non-performing assets (NPAs) of banks are projected to increase by 8 to 9 per cent in the current financial year. This information was given by Crisil, the credit rating agency. According to PTI, if this happens, it will be much lower than the 11.2 per cent figure at the end of the 2017-18 financial year.
PL/KA/PL/20 OCT 2021