या कारणांमुळे महिलांमध्ये वाढतोय हृदयविकाराचा धोका

यामुळे महिलांमध्ये वाढतोय हृदयविकाराचा धोका

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): युरोपियन स्ट्रोक ऑर्गनायझेशनमध्ये सादर करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार कामाचा ताण (work stress) आणि झोपेची कमतरता यामुळे महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका (heart attack) आणि स्ट्रोकचा धोका वाढत आहे.

पुरुषांपेक्षा महिलांना हृदयविकाराचा धोका जास्त
Women have a higher risk of heart attack than men

मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्ट्रॉल, धूम्रपान आणि लठ्ठपणा सामान्यतः हृदयरोगाच्या जोखमीमध्ये समाविष्ट आहेत. संशोधनानुसार कामाचा ताण (work stress), तणाव, झोपेच्या विकारांमुळे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका (heart attack) आणि स्ट्रोकची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. संशोधनाच्या लेखकांचे म्हणणे आहे की सर्वसाधारणपणे महिलांच्या तुलनेत पुरुषांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा जास्त त्रास असल्याचे मानले जाते. परंतू आता काही देशांमध्ये महिलांनी पुरुषांना या प्रकरणात मागे टाकले आहे. आता कामाचा ताण महिलांना हृदयरोगाचा इशारा देणारे संकेत देत आहे.

कामाचा ताण आणि थकवा ही मुख्य कारणे आहेत
Work stress and fatigue are the main causes

संशोधनात असे आढळून आले की पुरुषांमध्ये महिलांपेक्षा धूम्रपान करण्याची आणि लठ्ठ होण्याची शक्यता जास्त असली तरी, हृदयविकाराचा झटका (heart attack) आणि स्ट्रोकची सर्वाधिक प्रकरणे महिलांमध्ये दिसून आली. झुरीचच्या युनिव्हर्सिटी रुग्णालयाचे न्यूरोलॉजिस्ट डॉ मार्टिन हॅन्सेल आणि त्यांच्या चमुचे म्हणणे आहे की, महिलांमध्ये या गंभीर आजारांमध्ये वाढ होण्याचे कारण, कामाच्या ठिकाणी जास्त कामाचा ताण (work stress), झोपेचे विकार आणि थकवा हे आहे.

पूर्णवेळ काम करणाऱ्या महिलांना हृदयविकाराचा धोका जास्त
Women who work full-time have a higher risk of heart attack

आश्चर्याची बाब म्हणजे पूर्ण वेळ काम करणाऱ्या महिलांमध्ये या आजाराचा धोका सर्वाधिक दिसून आला आहे. पथकाच्या मते, कार्यालयात पूर्णवेळ काम करणाऱ्या महिलांवर घर आणि कार्यालयाची जबाबदारी निभावण्याचा ताण तीन ते चार तास नोकरी करणाऱ्या महिलांपेक्षा जास्त असतो.

थकवा आणि झोपेच्या विकारात वाढ
Increased fatigue and sleep disorders

संशोधकांनी 2007, 2012 आणि 2017 च्या स्विस आरोग्य सर्वेक्षणातील 22,000 महिला आणि पुरुषांच्या आकडेवारीची तुलना केली. त्यात त्यांना आढळले की हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगासाठी अपारंपरिक जोखीम घटकांची तक्रार करणाऱ्या महिलांची संख्या चिंताजनक वाढली आहे. एकूणच, कामावर असताना ताण घेणाऱ्या पुरुष आणि स्त्रियांची संख्या 2012 मध्ये 59 टक्क्यांवरून 2017 मध्ये 66 टक्के झाली.
काम केल्यानंतर थकल्यासारखे वाटणाऱ्या लोकांची संख्या 23 टक्क्यांवरून 29 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. या काळात झोपेच्या विकारांसंबंधीच्या आजाराची संख्या 24 टक्क्यांवरून 29 टक्क्यांपर्यंत वाढली. पुरुषांमध्ये झोपेच्या विकारांचे प्रमाण 5 टक्क्यांनी वाढले आहे, तर महिलांमध्ये ते 8 टक्क्यांनी वाढले आहे.
या संशोधनानंतर हे स्पष्ट झाले आहे की आता हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यापुढे पुरुषांशी संबंधित आजार नाहीत, काळजी घेतली नाही तर कामाच्या ताणामुळे महिलांमध्ये देखील या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. तज्ञांच्या मते, अशी परिस्थिती टाळण्यासाठी, महिलांनी काम करताना ताण कमी घेण्याची आणि झोप घेण्याची आवश्यकता आहे.
According to research presented at the European Stroke Organization, work stress and lack of sleep increase the risk of heart attack and stroke in women. Research has shown that heart attacks and strokes are no longer men-related illnesses, and if not taken care of, work stress can increase the risk of these serious illnesses in women as well.
PL/KA/PL/11 SEPT 2021