कोरोनामुळे रुग्णांमध्ये किडनीच्या आजाराचा धोका वाढला

कोरोनामुळे रुग्णांमध्ये किडनीच्या आजाराचा धोका वाढला

वॉशिंग्टन, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणूचा (corona virus) संसर्ग झालेल्या लोकांच्या आरोग्यावर या प्राणघातक विषाणूचा खोल परिणाम होत असल्याचे आढळून येत आहे. संसर्गातून बरे झाल्यानंतरही अनेक समस्या निर्माण होत आहेत. आता या विषाणूमुळे पीडितांमध्ये किडनीच्या (kidney) आजाराचा धोका दिसून येत आहे. एका नवीन संशोधनानुसार, कोरोनाचा दीर्घकालीन परिणाम म्हणून किडनीच्या कार्यक्षमतेमध्ये घट झाल्याचे आढळले आहे. कोरोनाचा सौम्य संसर्ग झालेल्या अनेक पीडितांमध्येही अशाप्रकारची समस्या आढळून आली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांच्या किडनीच्या कार्यक्षमतेकडेही लक्ष द्यायला हवे
The function of the kidneys of those infected with the corona virus should also be considered

अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांच्या मते, कोरोना विषाणूचा (corona virus) संसर्ग झालेल्या लोकांमध्ये किडनी (kidney) खराब होण्याचा धोका जास्त असल्याचे दिसून आले आहे. यामुळे किडनीच्या आजाराचा धोका वाढू शकतो. संशोधनाचे निष्कर्ष अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. वॉशिंग्टन विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक झियाद अल-अली यांनी सांगितले की निष्कर्षावरुन स्पष्ट होते की कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या किडनीच्या कार्यक्षमतेकडेही लक्ष द्यायला हवे. याद्वारे हजारो लोकांना या धोक्यापासून वाचवले जाऊ शकते.

अतिदक्षता कक्षात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये किडनी आजाराचा सर्वाधिक धोका
The highest risk of kidney disease in patients admitted to the intensive care unit

संशोधकांनी 1 मार्च 2020 ते 15 मार्च 2021 दरम्यान 17 लाखांहून अधिक निरोगी आणि कोरोना (corona virus) बाधित प्रौढांच्या डेटाच्या विश्लेषणाच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. संशोधनामध्ये एक लाख 51 हजारांहून अधिक महिलांचा डेटाही लक्षात घेण्यात आला आहे. झियाद यांनी सांगितले की, किडनीची (kidney) कार्यक्षमता कमी होण्याचा सर्वाधिक धोका अतिदक्षता कक्षात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये आढळून आला आहे.
The deadly virus has been found to have a profound effect on the health of people infected with the corona virus. Even after recovery from the infection, many problems continue to arise. Now the virus poses a risk of kidney disease in victims. According to a new study, the long-term effect of corona has been found to be a decrease in kidney function.
PL/KA/PL/04 SEPT 2021