यवतमाळ जिल्ह्यात आढळले ६ कोटी वर्ष जुने कॉलम्नार बेसॉल्ट

यवतमाळ जिल्ह्यात आढळले ६ कोटी वर्ष जुने कॉलम्नार बेसॉल्ट

यवतमाळ, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यवतमाळ जिल्हा ऐतिहासिक दृष्ट्या जसा संपन्न आहे , तसाच भौगोलिकदृष्ट्याही संपन्न आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा ते झरी मार्गावर नुकतेच तब्बल सहा कोटी वर्षांपूर्वीचे अत्यंत दुर्मिळ असे कॉलम्नार बेसाल्ट columnar basalt अर्थात  “अग्निस्थळक” आढळले आहे. सदर “अग्निस्थळक” हे रस्त्याचे खोदकाम सुरू असताना आढळले आहे. याबाबत फारशी माहिती कुणाला नसल्यामुळे हे दगड म्हणजे एखाद्या प्राचीन राज महालाचे दगडी खांब असावे असा अंदाज होत होता. 6 crore year old columnar basalt found in Yavatmal district
मात्र याबाबत चंद्रपूर येथील खगोल अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर सुरेश चोपणे (Professor Chopne,) यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन याबाबत अधिकृत खुलासा केला आहे. सदर दगडी खांब stone pillar हे ऐतिहासिक नसून भौगोलिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले . सोबतच या दगडांचा कालावधी सहा कोटी वर्षा पेक्षाही अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारचे दगड संशोधकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून हे दगड सहा कोटी वर्षांपूर्वी 60 million years ago निर्माण झाले आहे . सहा कोटी वर्षांपूर्वी लाव्हा रसाचा उद्रेक झाला होता आणि हा रस वाहत वाहत याठिकाणी आला व त्याचा पाण्यासोबत संपर्क आल्याने तो लाव्हा थंड होऊन त्याचे या अशा प्रकारच्या दगडात रूपांतर झाल्याचेही प्राध्यापक चोपणे यांचे म्हणणे आहे .
अत्यंत दुर्मिळ असलेल्या या दगडांचे, या जागेचे संरक्षण झाले पाहिजे, जतन झाले पाहिजे असंही प्राध्यापक चोपणे पुढे म्हणाले. हा भौगोलिक ठेवा जतन केल्यास भूगोलाचा अभ्यास करणा-या वैज्ञानिकांना तसेच विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
He clarified that this stone pillar is not historical but geographical. He also said that the period of these stones is more than six crore years. This type of rock is very important for researchers and it was formed 60 million years ago. According to Professor Chopne, the lava erupted 60 million years ago, and when it came in contact with water, the lava cooled and turned into a rock.
ML/KA/PGB
10 July 2021