प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनचे शंभरहून अधिक लष्करी सराव

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनचे शंभरहून अधिक लष्करी सराव

नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पूर्व लडाखमधील (eastern Ladakh) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) एकीकडे भारत चीनसोबत सीमावाद सोडवू इच्छित आहे तर दुसरीकडे चीनच्या (China) हेतूवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) यावर्षी तिबेटच्या (Tibet) सीमेवर 100 हून अधिक सैन्य सराव केले आहेत तर पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ काही ठिकाणी सैन्य माघारी प्रगतीपथावर आहे. याव्यतिरिक्त, चीनने गेल्या आठवड्यात तिबेटची राजधानी ल्हासा आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरील शहर निंगची यादरम्यान बुलेट ट्रेन सेवा सुरू केली आहे.

चीनची लष्करी कारवाई सुरूच आहे
China’s military action continues

एका वृत्तानुसार, या घडामोडींवरून असे सूचित होते की फेब्रुवारी महिन्यात पँगाँग त्सो (Pangong tso) येथील सैन्य माघारीनंतरही चीन (China) वादग्रस्त हिमालयीन सीमेजवळ आपली लष्करी क्षमता वाढवत आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये गॅलवान खोर्‍यातील घटनेनंतर चीनने सीमेवर आपली उपस्थिती वाढविली असल्याचे वृत्तात म्हटले आहे. कोव्हिड साथ असतानाही चीनची लष्करी कारवाई सुरूच आहे.

प्रतिकूल हवामानात सैन्याची लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी सराव
Exercise to increase the combat capability of the army in adverse weather

उंचावर असलेल्या भागात झालेल्या सैन्यात सराव चीनच्या 20 तुकड्यांमधील 1000 हून अधिक सैनिक सहभागी झाले होते. प्रतिकूल हवामानात चिनी सैन्याची लढाऊ क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने तिबेट स्वायत्त प्रदेशात हा सराव करण्यात आला होता. चीनने (China) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) जवळील भागात पायाभूत सुविधांमध्ये वेगाने सुधारणा केली आहे. जी भारतासोबत त्याची वास्तविक सीमा आहे. चीन आणि भारत यांच्यात लष्करी चर्चेच्या सुमारे 11 फेर्‍या झाल्या आहेत.

सैन्याच्या तयारीचा आढावा
Review of troop readiness

दुसरीकडे मंगळवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी हिमाचल प्रदेश क्षेत्रातील चीनबरोबर (China) असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) अनेक आघाडीच्या ठिकाणांचा दौरा केला आणि संवेदनशील भागातील भारताच्या सैन्याच्या तयारीचा आढावा घेतला. जनरल रावत यांनी चंडीमंदिर येथे भारतीय सैन्याच्या पश्चिम कमांडच्या मुख्यालयाला भेट दिली जिथे त्यांनी पाकिस्तान लगत असलेल्या सीमेवर मोहिमेसंबंधी परिस्थितीचा आढावा घेतला. अधिकार्‍यांनी ही माहिती दिली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आघाडीच्या ठिकाणावर असलेल्या सैनिकांशी संवाद साधताना जनरल रावत यांनी देशाच्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याच्या आपल्या कार्यावर ठाम राहण्याचे आवाहन केले.

चीनच्या स्थितीत लवचिकता दिसून आलेली नाही
China’s position has not shown resilience

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सुमोदोह सेक्टरमधील त्यांचा दौरा पूर्व लडाखमध्ये (eastern Ladakh) संघर्षाच्या अनेक ठिकाणी भारत आणि चीनच्या (China) सैन्यामध्ये तणाव कायम असताना झाला आहे. दोन्ही देश संघर्षाच्या ठिकाणांहूनही सैन्य माघारीबाबत चर्चा करत आहेत. लष्करी अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार संवेदनशील क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) दोन्ही बाजुला सुमारे 50,000 ते 60,000 सैनिक आहेत. एकूण 11 फेर्‍यांच्या लष्करी चर्चेनंतरही चीनच्या स्थितीत लवचिकता दिसून आलेली नाही.
 
On the one hand, India wants to resolve its border dispute with China near the Line of Actual Control (LAC) in East Ladakh, while on the other hand, questions are once again raised about China’s intentions. China’s People’s Liberation Army (PLA) has conducted more than 100 military exercises on the Tibetan border this year, while military withdrawal is in progress in some areas near the Line of Actual Control in eastern Ladakh.
PL/KA/PL/30 JUNE 2021