कसोटी मालिकेत भारत इंग्लंडला किती फरकाने हरवेल : सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

Sunil-Gawaskar

नवी दिल्ली, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध 4 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. इंग्लंड दौर्‍यावर टीम इंडियाला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध 18 जूनपासून खेळायचा आहे आणि जवळपास दीड महिन्यानंतर त्यांना इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळावी लागणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसंदर्भात चर्चा सुरू झाली असून सर्व अनुभवी क्रिकेटपटूही त्याच्या निकालासंदर्भात आपली भविष्यवाणी सांगत आहेत. या मालिकेत टीम इंडिया इंग्लंडला कोणत्या फरकाने नमवेल याचा अंदाजही सुनीव गावस्कर (Sunil Gavaskar)यांनी व्यक्त केला आहे.
गावस्कर यांनी टेलीग्राफला सांगितले की, “इंग्लंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या सहा आठवड्यांनंतर कसोटी मालिका सुरू होईल. अशा परिस्थितीत त्याचा निकाल टीम इंडियावर कमी किंवा काही परिणाम देणार नाही. जर मालिका ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये खेळली गेली तर भारत ही मालिका 4-0 ने जिंकेल. या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या खेळपट्टीबद्दल ओरड करणारा इंग्लंड भारताला हिरवी खेळपट्टी देऊ शकेल.
गावस्कर म्हणाले, ‘हिरव्या खेळपट्ट्यांवर खेळणे आता टीम इंडियासाठी अडचण नाही. भारतीय संघाकडे असा गोलंदाजीची रणनिती आहे, ज्यामुळे इंग्लिश फलंदाज अडचणीत येऊ शकतात. टीम इंडियाने सध्या साऊथॅम्प्टन गाठली आहे, जिथे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे.
 

टीम इंडियाचे इंग्लंड दौर्‍याचे संपूर्ण वेळापत्रक

Full schedule of Team India tour of England

18-22 जून, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, साऊथॅम्प्टन
 
भारत विरुद्ध इंग्लंड
 
4 ते 8 ऑगस्ट, पहिला टेस्ट मॅच, ट्रेंट ब्रिज, नॉटिंगमशर
 
12 ते 16 ऑगस्ट,  दुसरा टेस्ट, लॉर्ड्स, लंडन
 
25 ते 29 ऑगस्ट, तिसरा कसोटी, हेडिंगले, लीड्स
 
2 ते 6 सप्टेंबर, चवथा टेस्ट, केनिंग्टन ओव्हल, लंडन
 
10 ते 15 सप्टेंबर, पाचवी कसोटी, एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
Team India wants to play a five-match Test series against England from August 4 to September 14. On the tour of England, Team India will play the final of the ICC World Test Championship against New Zealand from June 18 and will have to play a Test series against England after nearly a month and a half.
HSR/KA/HSR/ 4 JUNE  2021