वांद्रे कलानगर जंक्शन येथील उड्डाणपूलाचा लोकर्पण सोहळा

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वांद्रे कलानगर जंक्शन येथील उड्डाणपूलाच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. एमएमआरडीएच्या विकासकामामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांचे मोठे योगदान आहे. परंतु उड्डाणपुल मार्गिकेच्या कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेत फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख नाही. महाराष्ट्रातील राजकीय परंपरेला हे न शोभणारे आहे, त्यामुळे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या कृतीचा तीव्र निषेध नोंदवत आजच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
This has never happened in the politics of Maharashtra, but in the last few days, the Mahavikas Aghadi has started laying such a wrong foundation, alleged Darekar.
कलानगर जंक्शन येथील सागरी सेतूकडून बांद्रा संकुलच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या मार्गिकेचे लोकार्पण आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. यासंदर्भात बोलताना दरेकर यांनी राज्य सरकारवर टिका केली. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत मुंबईच्या विकासासाठी दिवस रात्र परिश्रम घेतले. मध्यरात्री २ ते ३ वाजता देखील देवेंद्र फडणवीस यांनी कामाच्या ठिकाणी भेटी दिल्या. मुंबईच्या विकासकामाचे महाविकास आघाडीने श्रेय घ्यावे, मात्र ज्यांनी पाया रचला किंबहुना प्रकल्प पूर्णत्वास नेला त्यांना कार्यक्रमांना निमंत्रण देणे गरजेचं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात असे कधी झाले नाही, मात्र गेल्या काही दिवसांपासून असा चुकीचा पायंडा पाडण्याचा प्रकार महाविकास आघाडीने सुरु केला आहे, असा आरोप दरेकरांनी केला.
मुंबईच्या विकासाचे काही कार्यक्रम अलीकडच्या काळात पार पडले. त्यामध्ये जाणीवपूर्वक विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख निमंत्रण पत्रिकेवर करण्यात आला नाही. निमंत्रण पत्रिकेमध्ये विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते यांचे नाव आहे, परंतु विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याचे नाव नसल्यामुळे मी कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहे, असे स्पष्ट करतानाच ते म्हणाले की, मालाड आणि कांदिवली येथील मेट्रो स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमावर आम्ही बहिष्कार टाकला होता. आमचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी याप्रकरणी आंदोलन केलं. या सरकारला याचं काहीही घेणं देणं नाही. राज्य सरकारची मनमानी या ठिकाणी सुरू आहे “हम करे सो कायदा” अशी कृती राज्य सरकारची सुरु असल्याची, खंत दरेकर यांनी व्यक्त केली.
Chief Minister Uddhav Thackeray today inaugurated the flyover from Sagari Setu at Kalanagar Junction towards Bandra Complex. Speaking in this regard, Darekar criticized the state government. Devendra Fadnavis worked day and night for the development of Mumbai during his tenure as Chief Minister. Devendra Fadnavis also visited the work place from 2 to 3 in the middle of the night. The Mahavikas Aghadi should be credited for the development work in Mumbai, but those who laid the foundation or completed the project needed to be invited to the event.
ML/KA/PGB
28 Jun 2021