राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात घडलेल्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची आम आदमी पार्टी मागणी

राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात घडलेल्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची आम आदमी पार्टी मागणी

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या श्रीनिवास यल्लपा या रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे . या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टी राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन – शर्मा यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात केली . Aam Aadmi Party demands a high level inquiry into the incident that took place in the intensive care unit of Rajawadi Hospital
मुंबईतील राजावाडी रुग्णालय हे मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित येते .तेथील अतिदक्षता विभागामध्ये श्रीनिवास यल्लपा नामक मुलाचा डोळा उंदरांनी कुरतडला .
त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. कारण मुंबई पालिका रुग्णालयातील 133 आयसीयु बेड हे आउटसोर्स म्हणजे भाड्याने दिलेले आहेत .तो करार दोन वर्षाचा आहे .आयसीयू बेडची एजन्सी क्रिटिकल केअर अँड असोशियन यांच्या नावाने आहे. त्याच्या परवाना अंधेरीतील बीएमसी महानगरपालिकेत काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी श्रीमती मलिक यांच्या नावाने आहे. श्रीमती मलिक यांच्या आई डॉक्टर सीमा मलिक या सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी आहेत .त्या पूर्वी महापालिका रुग्णालयात होत्या . या बेडचे कॉन्ट्रॅक्ट पेशंट मागे 2200 रुपये दराने दिले जाते .असेच कॉन्ट्रॅक्ट दोन वर्षाकरिता दिले गेलेले आहे.
प्रश्न असा आहे की, बेड बीएमसी डॉक्टर, कर्मचारी , बीएमसी हॉस्पिटल बीएमसी प्रत्येक रुग्णाच्या मागे दोन हजार दोनशे रुपये दर आकारला जातो तो कशाच्या आधारे आणि ही पैशाची उधळण कशा करतात असा सवाल सवाल करत , क्रिटी केअर अँड असोशियन कंपनीचे डॉ. राजेश चंदानी व अर्पिता मलिक यांची रीतसर चौकशी व्हावी अशी मागणीही प्रीती मेनन यांनी यावेळी केली. त्या पुढे म्हणाल्या की, आताही शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महानगरपालिका ही लोकांसाठी राहिली नाही .आम्ही येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये २२७ जागांवर निवडणूक लढवणार आहोत .तसेच दिल्लीच्या धर्तीवर जनतेची मागणी पूर्ण करणार आहोत .त्यासाठी येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमचा अजेंडा असणार तो अजेंडा म्हणजे दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोडवलेले जनतेचे प्रश्न आहे .त्याच धर्तीवर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा एजेंडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी आम आदमी पक्षाने मुंबई प्रदेश कमिटीची स्थापना केली आहे .आम आदमी पार्टी प्रत्येक प्रभागामध्ये आपला अध्यक्षाची नेमणूक करणार आहे .असे प्रीती मेनन यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला मुंबई अध्यक्ष रुबेन व मुंबई महिला अध्यक्ष सुमित्रा श्रीवास्तव
उपस्थित होते.
The question is, based on which bed BMC doctors, staff, BMC Hospital BMC is charged Rs. Preity Menon also demanded a formal inquiry into Rajesh Chandani and Arpita Malik. She further said that Mumbai Municipal Corporation, which is still ruled by Shiv Sena, is no longer for the people. We will contest 227 seats in the coming municipal elections. We will also fulfill the demands of the people on the lines of Delhi. This is the problem of the people solved by Kejriwal.Our agenda will be prepared in the coming elections on the same lines. For this, the Aam Aadmi Party has set up a Mumbai Pradesh Committee.The Aam Aadmi Party will appoint its president in each ward, said Preeti Menon. The press conference was attended by Mumbai President Ruben and Mumbai Women’s President Sumitra Srivastava
Were present.
ML/KA/PGB
30 Jun 2021