Month: May 2021

Featured

मार्च तिमाहीत जीडीपी विकास दर 1.3 टक्के राहील – एसबीआय

नवी दिल्ली, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मागील आर्थिक वर्ष 2020-21 च्या चौथ्या तिमाहीत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाचा विकास दर (GDP Growth Rate) 1.3 टक्के राहील. एसबीआय रिसर्चचा (SBI Research ) अहवाल इकोरॅपमध्ये हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अहवालात सांगण्यात आले आहे की गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था (economy) सुमारे 7.3 टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज […]Read More

ऍग्रो

26  मे रोजी होणारे शेतकरी आंदोलन हे शक्ती प्रदर्शन नाही

नवी दिल्ली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांचा निषेध पुन्हा एकदा तीव्र होत आहे. 26  मे रोजी पुन्हा एकदा किसान संयुक्त मोर्चाच्या (SKM) बॅनरखाली दिल्लीच्या सीमेवर एकत्र येत आहेत, पण त्यांचे आंदोलन शक्तीप्रदर्शन म्हणून पाहिले जाऊ नये, असे किसान मोर्चाचे म्हणणे आहे. आपला हेतू आपली शक्ती दर्शविणे हा नाही तर हा […]Read More

अर्थ

जीएसटी परिषदेच्या बैठकीत कोरोनाच्या वस्तूंच्या कर कपातीवर चर्चा होणार

मुंबई, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वस्तू व सेवा कर (GST) परिषदेच्या पुढच्या बैठकीत राज्यांना भरपाई कमी मिळत असल्याच्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते. त्याचबरोबर कोरोनाच्या (corona) सामग्रीवरील कर दर कमी करण्याबाबतही चर्चा होईल. 28 मे रोजी होणार्‍या बैठकीत, वैयक्तिक वापरासाठी ऑक्सिजन काँन्स्ट्रेटरच्या (oxygen concentrator) आयातीवरील 12 टक्के करात कपात करण्याचा निर्णय होऊ शकेल.   वस्तू व […]Read More

ऍग्रो

इस्रायल बनणार भारतातील कृषी विकासाचे भागीदार, काय आहे नवीन योजना

नवी दिल्ली, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संरक्षण उपकरणांसाठी प्रसिध्द असलेला इस्त्राईल (Israel), भारतातील शेतीच्या वाढीसाठी आपला वाटा आणखी वाढवेल. इस्रायल शेतीच्या क्षेत्रातही खूप पुढे आहे. 1993 पासून ते या क्षेत्रात भारताला पाठिंबा देत आहेत. दोघांमधील कृषी क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी पुन्हा एकदा 3 वर्षाच्या कार्यक्रमावर स्वाक्षरी झाली आहे. दोन देशांमधील तंत्रज्ञानाची देवाणघेवाण केल्यास फळबागांची […]Read More

Featured

कोरोना काळात वित्तीय संस्थांचा ग्राहकांशी संपर्क तुटला

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाच्या (corona) दुसर्‍या लाटेने बँका (Banks) आणि वित्तीय संस्थांसमोर ग्राहकांशी (consumers) संपर्क तुटल्याचे संकट उभे ठाकले आहे. काही दिवसांपूर्वी बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांनी (NBFC) म्हटले होते की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक कोरोना (corona) पॉझिटिव्ह झाले आहेत त्यामुळे त्यांचे कर्मचारी आणि वसुली प्रतिनिधी ग्राहकांशी (consumers) संपर्क साधू शकत नाहीत. आता हेच […]Read More

अर्थ

सेन्सेक्समध्ये १००० अंकांची तेजी,कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीच्या आकड्यांचे उत्तम प्रदर्शन व

मुंबई, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात बाजारावरती विदेशी बाजरातील संकेत,कोरोना रुग्णसंख्येतील घट,अमेरिकेतील महागाईचे आकडे, कंपन्यांचे चवथ्या तिमाहीचे आकडे व आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय मौसम विभागाने पावसासंबंधी केलेले निवेदन या सगळ्याचा प्रभाव राहिला.सेन्सेक्स आणि निफ्टीने आपली तीन आठवड्यातील उत्तम कामगिरी बजावली. Sensex, Nifty Clock Best Weekly Gains In Three Months   पहिल्याच दिवशी सेन्सेक्समध्ये […]Read More

ऍग्रो

सरकारने 75514.61 कोटी रुपये 39.55 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात केले वर्ग

नवी दिल्ली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील हंगामांप्रमाणेच सध्याच्या रब्बी विपणन हंगामात आरएमएस 2021-22 च्या किमान आधारभूत किंमतीवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये गहू खरेदी सुरळीत सुरू आहे. आणि आतापर्यंत (20.05.2021पर्यंत) 382.35 लाख मेट्रिक टन गहू खरेदी करण्यात आला आहे, तर गतवर्षी याच कालावधीत 324.81 […]Read More

अर्थ

केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ, दीड कोटी कर्मचार्‍यांना होणार फायदा

नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने शुक्रवारी केंद्रीय कर्मचार्‍यांच्या (central employees) बदलत्या महागाई भत्त्यात (dearness allowance) वाढ करण्याची घोषणा केली. 1.5 कोटींपेक्षा जास्त कर्मचार्‍यांना दरमहा 105 ते 210 रुपये मिळतील. ही वाढ 1 एप्रिल 2021 पासून अंमलात येईल आणि त्यामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांच्या (central employees) किमान वेतनातही वाढ होणार आहे. केंद्र […]Read More

ऍग्रो

भारत दक्षिण कोरियाला GI टॅग केलेला आंबा निर्यात करतो, शेतकऱ्यांना

नवी दिल्ली, दि. 21(एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण कोरियाला आंब्याची निर्यात वाढविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) सोलमधील भारतीय दूतावास आणि कोरियाच्या इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या सहकार्याने व्हर्च्युअल बायर-विक्रेता बैठक (VBSM) आयोजित केली. एपीडा, भारतीय दूतावास, आयसीसीके, भारत आणि दक्षिण कोरियाच्या आयातदार यांच्या निर्यातदारांनी काल व्हीबीएसएममध्ये […]Read More

अर्थ

केंद्र सरकारने आयकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत वाढवली

नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकारने वैयक्तिक आयकर विवरणपत्र (Income Tax Return) दाखल करण्यासंदर्भात मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवून 30 सप्टेंबर करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त कंपन्यांसाठी देखील आयकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) (CBDT) कंपन्यांनाही आयकर […]Read More