आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी डम्पिंग ग्राउंड परिसराची पहाणी केली

कल्याण, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 25 मे 2020 पासून शून्य कचरा मोहीम राबविण्यास प्रारंभ केल्यानंतर आता 25 मे 2021 रोजीवर्षापूर्तीअंती डम्पिंग ग्राउंड वर कचरा टाकणे बंद केल्यानंतर आज आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी डम्पिंग ग्राउंड परिसराची ,घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्यासमवेत पहाणी केली. या डम्पिंग ग्राउंड वरील कचऱ्याचे बायोमायनिंग करून सपाटीकरण केले जाईल आणि या जागेवर अतिशय सुंदर असे उद्यान, सायकल ट्रॅक व जॉगिंग ट्रॅकची उभारणी केली जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. बिल्डींग परमिशन देताना कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या अटी त्यामध्ये अंतर्भूत असतात,परंतु या अटी पालन न केल्यास संबंधित विकासकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल,असेही ते पुढे म्हणाले.The dumping ground at Aadharwadi will be closed from now on and the waste will be processed at Umbarde and Barave.
आता यापुढे आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंड बंद केल्यामुळे उंबर्डे आणि बारावे येथे कचरा प्रक्रिया करण्यात येईल . यापूर्वी कचऱ्याचे वर्गीकरण व्यवस्थित होत नव्हते,आता ओला कचरा हा आता बायोगॅस व कंपोस्टिंग साठी पाठवला जातो आणि सुका कचरा उचलण्यासाठी या एजन्सी पुढे आलेल्या आहेत आणि त्यांचेकडून महानगरपालिकला रॉयल्टी देखील मिळते अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
Earlier, waste sorting was not done properly, now wet waste is now sent for biogas and composting and these agencies have come forward to pick up dry waste and also get royalty from them, he said.
AG/KA/PGB
26 May 2021