कोरोना विषाणूची चाचणी अवघ्या पंधरा मिनिटांत

कोरोना विषाणूची चाचणी अवघ्या पंधरा मिनिटांत

नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणुचा (coronavirus) फैलाव रोखायचा असेल तर पीडित व्यक्तीमधील लक्षणे लवकरात लवकर शोधून त्यावर उपचार केले पाहिजेत. शास्त्रज्ञांनी कोव्हिड-19 ची (covid-19) चाचणी करण्यासाठी एक लॅपटॉपच्या आकाराचा संच तयार केला आहे जो अवघ्या 15 मिनिटात कोव्हिड-19 पॉजिटिव चा शोध घेईल.
या यंत्राद्वारे अतिसंसर्गजन्य प्रकार देखील शोधले जाऊ शकतात. कोरोना विषाणूची तपासणी करणारे हे उपकरण कॅलिफोर्नियामधील साल्क इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल स्टडीजने विकसित केले आहे. कोरोना पीडित व्यक्तीची वेळेत ओळख पटल्यास विषाणूवर लवकर नियंत्रण केले जाऊ शकते. या यंत्राद्वारे केवळ कोरोना विषाणूचीच ओळख पटणार नाही तर इन्फ्लूएन्झा सारख्या इतर विषाणूंचाही शोध घेतला जाऊ शकतो.
 
निर्वाणा चाचणीद्वारे आपण काही मिनिटांत विषाणू (coronavirus) शोधू शकतो. हे यंत्र विषाणूचे उत्परिवर्तन स्पष्ट ​​करण्यासाठी अवघ्या तीन तासांत जेनेटिक सिक्वेन्सिंगचे कामही करू शकते. विषाणू किती वेगाने पसरत आहे हे या यंत्राद्वारे लवकरात लवकर समजू शकते.
 

एकच पोर्टेबल चाचणी
A single portable test

विषाणूचा (coronavirus) शोध घेण्यासाठी आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी हे एक स्वस्त आणि चांगले यंत्र आहे, त्यासाठी महागड्या पायाभूत सुविधांची आवश्यकता नाही. सह-लेखक आणि साल्कच्या जीन एक्सप्रेशन प्रयोगशाळेतील प्राध्यापक असलेले जुआन कार्लोस इजिपिसुआ बेलमोंटे सांगतात की, ज्या कामासाठी दोन किंवा तीन वेगवेगळ्या चाचण्या आणि यंत्राचा वापर केला जातो तेच काम आपण एकाच पोर्टेबल चाचणीमध्ये पूर्ण करु शकतो. सध्या कोव्हिड-19 (covid-19) रुग्णांच्या चाचणीसाठी पॉलिमेरेज चेन रिऍक्शन (पीसीआर) चाचणीची प्रक्रिया समाविष्ट असते. पीसीआर चाचणी उच्च प्रमाणित चाचणी मानली जाते जी विषाणूच्या अनुवांशिक सामग्रीचा शोध घेते.

इतर विषाणूंचीही ओळख पटेल
Other viruses will also be identified

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हा चाचणी संच अवघ्या 15 मिनिटांत निगेटिव्ह किंवा पॉजिटिव्ह अहवाल सांगू शकते. यंत्राच्या चाचणीचे निष्कर्ष ‘मेड’ पत्रिकेमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. सौदी अरेबियामधील किंग अब्दुल्ला सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. मो ली म्हणाले की लवकरच आम्हाला समजले की आम्ही हे तंत्रज्ञान केवळ सार्स-कोव्ह -2 शोधण्यासाठीच नाही तर हा संच एकाचवेळी इतर विषाणूंचीही ओळख पटवू शकतो.
 
In order to prevent the spread of coronavirus, the symptoms in the infected person should be detected and treated as soon as possible. Scientists have developed a laptop-sized set to test the Covid-19 that will detect the Covid-19 positive in just 15 minutes. Hypersensitivity types can also be detected by this device. The device, which detects the corona virus, was developed by the Salk Institute for Biological Studies in California.
PL/KA/PL/7 APR 2021