रेणू शर्मा प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची भाजपाची मागणी : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, दि. 13 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): रेणू शर्माच्या आरोपांची पोलिसांनी चौकशी जरूर करावी, पण धनंजय मुंडे यांनी काही गोष्टी मान्य केल्या असल्याने राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी त्यांची पाठराखण करू नये, असे आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात आयोजित एका पत्रकार परिषदेत सांगितले. राज्याच्या राजकारणात ही पहिलीच घटना असून संविधान आणि राजकीय संकेत झुगारून धनंजय मुंडे यांच्या कृतीला माफ करता येणार नाही असे ते म्हणाले.
कॅबिनेट मंत्र्यावर बलात्काराचा आरोप असून त्यांच्या कबुलीजबाबातून बलात्काराचं सत्य बाहेर आलं असल्याने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली. मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही तर भाजप राज्यभरात आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला.
 
Tag- resignation-Dhananjay-Munde-in-Renu-Sharma-case-Chandrakant Patil
ML/KA/DSR/13 JANUARY 2021