#टाटा समूह आणि रिलायन्स जीवोमध्ये ‘ऑनलाईन बाजार’ युद्ध भडकण्याची शक्यता!

नवी दिल्ली दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ज्याप्रमाणे चीनमध्ये जॅक मा आणि पोनी मा यांनी अलिबाबा आणि टेंन्सेन्टद्वारे तेथील अंतरजाल(इंटरनेट) व्यवसाय कब्जात घेतला आहे. तसेच आता भारतात 130कोटी अंतरजाल ग्राहकांचा व्यवसाय केवळ दोन लोकांपुरताच मर्यादित होण्याची शक्यता आहे.  ही बातमी आहे टाटा समूह एक ‘सुपर ऍप’ आणत आहे जे चायनीज ‘वी चॅट’सारखे असेल. असे मानले जात आहे की, टाटा सन्स त्याच्या सुपरऍपसाठी वॉलमार्टशी हातमिळवणी करू शकतात. याबाबतच्या वृत्तानुसार, वॉलमार्ट टाटा समूहात 25 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करू शकतो. या अ‍ॅपच्या मदतीने टाटा समूह आपला फॅशन, जीवनशैली, इलेक्ट्रॉनिक्स, रिटेल, किराणा, विमा, वित्त सेवा सारखे व्यवसाय एकाच व्यासपीठावर आणेल. वृत्तानुसार या सुपरऍपवर डिजिटल सामग्री, शैक्षणिक सामग्रीही उपलब्ध असेल.  Tata Group Super App Will Challenge Mukesh Ambani In Retail War

मुकेश अंबानी आणि टाटा समूह दोघांचेही आपापले फायदे आहेत. मुकेश अंबानी यांना जिओच्या 40कोटी उपभोक्त्यांचा फायदा आहे. या व्यतिरिक्त, रिलायन्सची रिटेल साखळी ही भारतातील सर्वात मोठी आहे. त्याची सुमारे 12 हजार दुकाने आहेत. रतन टाटा यांच्याबद्दल बोलायचे तर टाटा समूहाचे 100 हून अधिक व्यवसाय आहेत. ते चहापावडर पासून तर कारपर्यंतची उत्पादने घेतात. प्रत्येक श्रेणीतील व्यवसायासाठी पूर्णपणे स्वतंत्र पुरवठा यंत्रणा आहे.  Tata Group Super App Will Challenge Mukesh Ambani In Retail War

अशा वेळी टाटा समूह एक असे पोर्टल विकसित करत आहे ज्यावर त्याचे विक्रेते आपला माल विकू शकतील तर त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढेल. या सर्वांच्या दरम्यान, वॉलमार्टशी करार झाल्यास टाटाला फ्लिपकार्टचा पाठिंबा मिळेल. वॉलमार्टने फ्लिपकार्टचे 16 अब्ज डॉलरमध्ये अधिग्रहण केले होते. टाटा समूहासमोर काही आव्हाने आहेत. ते दूरसंचार व्यवसायातून बाहेर पडले आहे. जर ते असते तर या कामात फायदा झाला असता. एअर इंडिया आणि एअरएशिया समूहाची अवस्था वाईट आहे. टाटाला एव्हिएशन क्षेत्रात रहायचे असेल आणि एअर इंडिया, जी एकेकाळी टाटा कंपनी होती, ती विकत घ्यायची असेल तर त्यासाठी खूप पैशांची गरज भासणार आहे. टाटा समूहावर 20 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1.5 लाख कोटींहून अधिक कर्ज आहे. मुकेश अंबानी यांनी नुकतेच रिलायन्स इंडस्ट्रीजला निव्वळ कर्जमुक्त (नेट डेब्ट फ्री)  केले आहे.  Tata Group Super App Will Challenge Mukesh Ambani In Retail War

टाटा समूहाचा शापूरजी पालनजी मिस्त्री यांच्याशी वाद सुरु आहे. समूहाने एसपीजी समूहाशी टाटा सन्समधील 18.4 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याची चर्चा केली आहे. यासाठी त्याला अब्जावधी डॉलर्सची आवश्यकता भासेल. दुसरीकडे, रिलायन्सच्या बाबतीत बोलायचे झाले तर, मुकेश अंबानी यांनी रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्सवरील आपले अवलंबित्व कमी केले आहे. सध्या संपूर्ण जगात रिफायनिंग व्यवसायाची स्थिती अत्यंत वाईट आहे.

#Tata Group Mukesh Ambani In Retail War

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*