#कोरोनाचा व्हाईट हाऊस मधील मुक्काम वाढला!,: डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर प्रसारमाध्यम सचिव कायले मॅकनेनी यांना कोरोना संसर्ग!

वॉशिंग्टन दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणुला सध्या व्हाईट हाऊसचा मुक्काम आवडला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना विषाणूची लागण होवून ते बरे झाल्यानंतर आता त्यांच्या प्रसारमध्यम सचिव कायले मॅकनेनी देखील कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत.

त्यांनी ट्विट करुन सांगितले की गुरुवारपासून दररोज त्याची कोरोना विषाणूची चाचणी निगेटीव्ह येत होती. परंतू सोमवारी ती पॉजिटीव्ह आली आहे. व्हाईट हाऊसच्या वैद्यकीय कक्षाने कोणताही पत्रकार, निर्माता किंवा प्रसारमध्यमांचा सदस्य त्यांच्या संपर्कात आल्याचे मानलेले नाही.  white House Press Secretary Kayleigh Mcenany Tests Positive For Coronavirus
मॅकनेनी यांनी व्हाईट हाऊस मध्ये गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यानंतरच राष्ट्रपती ट्रम्प यांच्या सल्लागार होप हिक्स कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. यानंतर ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांचीदेखील कोरोना विषाणू चाचणी पॉझिटिव्हवर आली होती.  white House Press Secretary Kayleigh Mcenany Tests Positive For Coronavirus

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीविषयीच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यांनी म्हटले आहे की राष्ट्रपती ट्रम्प यांची प्रकृती वेगाने सुधारत आहे. शुक्रवारी सकाळपासून त्यांना ताप आलेला नाही. रक्तात ऑक्सिजनचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. सोमवारी ते व्हाईट हाऊसमध्ये परतू शकतात असेही डॉक्टरांनी सांगितले त्यानुसार ट्रम्प यांना सुटी देण्यात आली.  white House Press Secretary Kayleigh Mcenany Tests Positive For Coronavirus
वॉल्टर रीड नॅशनल मिलेट्री मेडिकल सेंटर मधील डॉ. सीन पी. कॉनले यांनी सांगितले की, त्यांची तब्येत निरंतर सुधारली आहे. शुक्रवारपासून त्यांना ताप आलेला नाही. रेमेडिसविर औषधाचा पाच दिवसांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याचे यकृत आणि मूत्रपिंड व्यवस्थित काम करत आहेत. याशिवाय ट्रम्प यांना झिंक, व्हिटॅमिन डी, फॅमोटीडाइन, मेलाटोनिन आणि अ‍ॅस्पिरिन देखील दिले जात आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*