१० हजार धारवीकारांना मोफत कोरोना लस

१० हजार धारवीकारांना मोफत कोरोना लस

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईच्या धारावीतील नागरिकांसाठी खासदार राहुल शेवाळे आणि   राधा फाऊंडेशन Radha Foundation यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत कोरोना लसीकरण मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या मोहिमेत आयसीआयसीआय लोम्बार्ड आणि सुराना हॉस्पिटलच्या सहाय्याने दोन दिवसांत सुमारे दहा हजार धारावीकरांना मोफत कोरोना लस  free corona vaccines दिली जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार सदा सरवणकर, नगरसेवक वसंत नकाशे, विधानसभा समन्वयक विठ्ठल पवार यांसह अन्य मानव्यर उपस्थित होते.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावी हा मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट hotspot of Corona ठरला होता. मात्र, राज्य सरकार, मुंबई मनपा, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि स्थानिक जनता यांच्या एकत्रित प्रयत्नांनी धारावीने यशस्वीरित्या कोरोनावर मात केली. त्यानंतर प्लाझमा दानातही  plazma donation धारावीकरांनी पुढाकार घेतला होता. आता कोरोना लसीकरणाबाबतीतही आघाडी घेण्याच्या उद्देशाने धारवीकरांसाठी या मेगा लसीकरण मोहिमेचे mega vaccination आयोजन करण्यात आले असल्याची माहिती   राधा फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आली.

राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने धारावीमध्ये Dharavi मोफत कोरोना लसीकरण केले जात आहे. मात्र, दाट लोकसंख्येच्या धारावीतील लसीकरण प्रक्रियेला आणखी गती मिळावी आणि सरकारी यंत्रणांवरील भार काही प्रमाणात कमी व्हावा, या हेतूने आयसीआयसीआय लोम्बार्ड च्या सहाय्याने मेगा लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या काळात अशाच रीतीने मोठ्या प्रमाणात धारवीकरांचे लसीकरण करण्याचा आमचा मानस आहे,असे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.

In the first wave of Corona, Dharavi became the hotspot of Corona in Mumbai. However, with the combined efforts of the state government, Mumbai Municipal Corporation, local people’s representatives, social organizations and local people, Dharavi successfully defeated Corona. After that, Dharavikar had also taken the initiative in plazma donation. According to the Radha Foundation, a mega vaccination campaign has been organized for Dharvikars with the aim of taking the lead in corona vaccination.

ML/KA/PGB
10 July 2021