अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज

10 thousand crore package

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली घोषणा करत राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले .

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले.From June to October 2021, heavy rains and floods in the state damaged more than 55 lakh hectares of agricultural crops.

या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एन डी आर एफ च्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आज आपण घेतला आहे असे मुख्यमंत्री म्हणाले .

ही मदत खालील प्रमाणे राहील…

This help will be as follows
• जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर
• बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर
• बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर .
ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.

ML/KA/PGB

13 Oct 2021