मूत्रपिंड निरोगी राखण्यासाठी या गोष्टींवर लक्ष द्या  

मुंबई, दि. 11 (एम एम सी न्युज नेटवर्क) 2021 या वर्षाची सुरुवात झाली आहे. यावर्षी आपले आरोग्य चांगले राखण्याला लोकांचे प्राधान्य असेल. कोरोना महामारीच्या परिणामामुळे हा बदल झाला आहे. यापूर्वी लोक आपल्या आरोग्याबाबत इतके जागरुक नव्हते. पण आता आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी सगळेच सक्रिय झाले आहेत. नव्या वर्षाच्या संकल्पात आरोग्य अग्रस्थानावर आहे. यामध्ये आपल्या किडनींचा म्हणजे मूत्रपिंडांच्या आरोग्याचा विचार करायचा झाला तर खाली दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण योग्य राखा

पाणी म्हणजे जीवन याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. पाणी प्रमाणाबाहेर पिणे किंवा कमी पिणे या दोन्हींचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. यामुळे मूत्रपिंडे निकामी होण्याचा धोका निर्माण होतो. यासाठी दररोज 8 ग्लाल पाणी प्या. मूत्रपिंड निरोगी राखण्यासाठी एका गोष्टीचे कायम भान ठेवा ते म्हणजे आपल्या लघवीचा रंग पिवळा असू नये. त्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या.

 योग्य आहार घ्या

मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडाशी संबंधित विकार होतात. त्यामुळे आपल्या आहारावर विशेष लक्ष द्या. मीठ कमी प्रमाणात खा. कोलेस्टेरॉलची पातळी कमी राखणारे पदार्थ खा. यामुळे रक्तातील साखर आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहातो.

तंदुरुस्त राहा

तंदुरुस्त राहाण्यासाठी दररोज व्यायाम करा. व्यायाम करण्यामुळे मूत्रपिंडाच्या विकारासह सर्व आजार दूर राहातात. नियमित व्यायामामुळे रक्तदाब, कोलेस्टॅरॉल आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहाते. व्यायामामुळे येणाऱ्या घामामुळे मूत्रपिंड निरोगी राहातात.

अतिरिक्त औषधांचा वापर टाळा

जर तुम्ही एखाद्या आजारावर औषधे घेत असाल तर ती योग्य प्रमाणात घ्या. डॉक्टरांनी लिहून दिलेलीच औषधे घ्या आणि ज्यांची गरज नाही ती औषधे घेऊ नका.

 डिस्क्लेमर: वर दिलेल्या मार्गदर्शक सूचना केवळ सर्वसामान्य माहिती साठी आहेत . कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय व्यावसायिकाचा सल्ला नाहीत. आजार किंवा संसर्गाच्या लक्षणांच्या स्थितीत डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या

 

Tag-Take-care-of-your-kidneys

 

DSR/KA/DSR/11 JANUARY 2021