
मथुरा, दि. 14 (एम एम सी न्यूज नेटवर्क) कोरोनाशी होणाऱ्या लढ्यात जगाला आयुर्वेदाने मोठ्ठा दिलासा दिला. या काळात आयुर्वेदिक औषध घेणाऱ्या लोकांमधील रोगप्रतिकार शक्ती वाढली असल्याचे आढळले असून कोरोनाशी लढतांना त्याचा उपयोग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता जगभरातून या औषधपद्धतीला मान्यता देण्यात आली आहे.
संस्कृति आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलने विशेषज्ञ चिकित्सकांसाठी आयोजित वेबिनारद्वारे जीवनशैलीशी निगडित आजार कमी करून त्यावर आयुर्वेदिक उपचारांबद्दल माहिती दिली. जीवनशैलीमध्ये बदल आणून सुदृढ आरोग्य आणि आयुष्य कसे जगावे याबद्दल वेबिनारने लोकांचे प्रबोधन केले.
माणसाचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य परस्परांवर अवलंबून असते त्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे आणि म्हणूनच आयुर्वेद हा यासाठीचा उत्तम पर्याय असल्याचे देखील सांगण्यात आले.
Tag-lifestyle-Changes-Ayurvedic-remedies-recognised
DSR/KA/DSR/14 JANUARY 2021