विल्सन जिमखाना वाचवण्यासाठी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, 3 : ११५ वर्षांपासून विल्सन महाविद्यालयाच्या अखत्यारित असलेला गिरगाव चौपाटीवरचा विल्सन जिमखाना परस्पर जैनांच्या जिओ इंटरनॅशनल ऑर्गनायजेशनच्या घशात घालण्यात आल्याने राज्य सरकारच्या भूमिकेवर नाराज झालेल्या ख्रिश्चन मंडळी ,आज माझी विद्यार्थी , खेळाडू तसेच गिरगावकर मंडळीनी सोमवारी मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा काढून जोरदार आंदोलन केले. विल्सन जिमखाना आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा अशा घोषणा देत हा जिमखाना पुन्हा ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.
याप्रसंगी जॉन विल्सन सोसायटीचे सचिव लालबहादूर कांबळे यांनी विल्सन जिमखानावर विल्सनच्या विद्यार्थ्यांसह गिरगाव परिसरातील खेळाडू येत असल्याचे सांगितले. इथे कोणालाही खेळताना कधी अडवणूक करण्यात आलेली नाही जिमखाना खेळायला सर्वांनाच अगदी मोफत होता. शासनाने जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला सदर जिमखाना अनधिकृत पणे हस्तांतरित केल्याचा कांबळे यांनी यावेळी आरोप केला आहे.
याचिका हायकोर्टात दाखल असताना सुद्धा पोलिसांनी, बाऊन्सर च्या मदतीने जिमखान्याचा बळजबरीने ताबा घेतल्याचे कांबळेनी म्हंटल आहे. त्यामुळे विल्सनचे विद्यार्थी, खेळाडू मंडळी स्थानिक गिरगावकर आजूबाजूची तरुण मंडळी खेळापासून वंचित राहिल्याचे त्यांनी सांगितले. जिओ संस्थेचा खेळाशी काही एक संबंध नसताना विल्सन जिमखाना शासनने परस्पर जिओ संस्थेला दिलेला आहे. त्याचा कांबळे यांनी उपस्थितांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध केला आहे.
सुरुवातीला जैन लोक मुंबईत पाहुणे म्हणून आले होते. आधी इकडच्या रस्त्यावरची त्यांनी नावे बदलून स्वतःची नावे द्यायला त्यांनी सुरुवात केली. मग मराठी लोकांच्या चाळी गिळू लागले आता स्टेशनची नाव बदलू लागले आहेत. या समाजाचा महाराष्ट्राच्या जडण घडणीत संबंध काय आहे असा प्रश्न आम्ही गिरगावकरचे सचिव मिलिंद वेदपाठक यांनी उपस्थित केला आहे. क्रिस्ती बांधव आणि आम्ही दुधात साखरेप्रमाणे पिढ्यानपिढ्या एकत्र राहत आलो आहेत. हे काल आले आणि आमच्यावर दादागिरी करायला लागले आहेत.घरात उंदीर शिरल्यावर त्याला कुणी पाळत नाही ठार मारून बाहेर काढतात असे उदाहरण त्यांनी दिले. संजय राऊत यांनी सकाळी या आंदोलनत उतरणार असल्याची माहिती दिली आहे पण ते दिल्लीला आहेत.पुढच्या आंदोलनात स्वतः उद्धव ठाकरे राज ठाकरे हे दोघे बंधू देखील उतरणार आहेत.
आंदोलन कडून भूखंड हस्तांतरित करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे एकाचे नाव (१) सहाय्यक अधीक्षक निरीक्षक नगर भूमापन अधिकारी प्रदीप तावरे, तर (२) किशोर ढोकळे परिरक्षण भूमापक मुंबई नगर भूमापन व भूमी अभिलेखा (शहर) असल्याचे समजले आहे.KK/ML/MS