विक्रोळी येथील प्रभात मित्र मंडळात शिवजयंती उत्साहात साजरी
मुंबई, दि १९: विक्रोळी कन्नमवार नगरातील ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळात प्रभात समयी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी मंडळाचे सल्लागार मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी,मंडळाचे अध्यक्ष विवेक गायकवाड, सचिव ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे,उपाध्यक्ष निवृत्ती मस्के,माजी अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य सुरेश सरनोबत,माजी अध्यक्ष,ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक कृष्णा काजरोळकर,माजी सचिव संजय मयेकर आदिंची भाषणे झाली.ज्याच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव नाही.तो हिंदु होत नाही.शिवाजी महाराज मनात नाही रक्तारक्तात आहे.महाराजांचा पुतळा पाहिला की,महाराजांच्याबद्दल प्रत्येक गोष्ट आठवते असे गौरवोद्गार माजी महापौर दत्ता दळवी यांनी काढले.प्रभातच्या गायक मंडळीनी शुर गीते गाऊन वातावरण प्रफुल्लित केले होते.मंडळाचे अध्यक्ष विवेक गायकवाड यांनी महाराष्ट्र गीत गाऊन ज्येष्ठ नागरिकांची मने जिंकली.कार्यक्रमास मंडळाचे सल्लागार चित्रोळीकार मुकुंद कुलकर्णी,वासुदेव कदम,मंडळाचे उपसचिव श्रध्दानंद निकम, खजिनदार गौतम नि.डांगळे यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी,जय शिवाजी या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.KK/ML/MS