वसई विरार इमारत वापर परवाना देण्यासाठी विभागीय आयुक्तांची नेमणूक…
मुंबई दि ९ : वसई विरार महापालिका हद्दीतील वापरात असलेल्या पन्नास टक्के इमारतींना वापर परवानाच देण्यात आलेला नाही त्यामुळे तो घेण्यासाठी विभागीय आयुक्तांनी याची चौकशी करून अभय योजना देखील राबवावी अशा सूचना दिल्या जातील अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत केली.
याबाबतची लक्षवेधी सूचना स्नेहा दुबे यांनी उपस्थित केली होती त्यावर राज्यमंत्री मिसाळ यांनी ही घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी यासाठी एक बैठक घेऊन अशा इमारतींना वापर परवाना देण्यासाठी दंड आकारून तो द्यावा अशा सूचना दिल्या होत्या, त्यासोबतच यासगळ्याचं सर्वेक्षण करून अहवाल तयार करावा असं ही सांगितलं होतं मात्र त्याचं पालन अद्याप महापालिकेनं केलेलं नाही असं राज्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. यामुळे विभागीय आयुक्तांनी याबाबत चौकशी करून आवश्यक तर बैठक घेऊन पुढील कारवाई करावी असे निर्देश देण्याचं मिसाळ यांनी यावेळी जाहीर केलं.ML/ML/MS