पाचगणीत पॅराग्लायडिंग वर्ल्ड कपचा थरार

 पाचगणीत पॅराग्लायडिंग वर्ल्ड कपचा थरार

पाचगणी, दि. १९ : महाबळेश्वर जवळील पाचगणी येथे सध्या पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप’ स्पर्धेचा थरार सुरू झाला आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन महासंचालनालय आणि हाय फ्लाय पॅराग्लायडिंग, पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जगातील सुमारे २५ देशांतील तब्बल २०० नामांकित पायलट या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. १५ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेसाठी रशिया, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका आदी देशांतील अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पायलट पाचगणीत दाखल झाले आहेत. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून हॉटेल व्यवसाय, लॉजिंग तसेच स्थानिक बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे.

पाचगणीत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय पॅराग्लायडिंग स्पर्धा होत असल्याने शहरातील हॉटेल्स, लॉजिंग आणि स्थानिक बाजारपेठेत मोठी तेजी आली आहे. या स्पर्धेमुळे केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर ‘ॲडव्हेंचर टुरिझम’मध्ये पाचगणीचा ब्रँड जागतिक स्तरावर पोहोचत आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *