नटश्रेष्ठ अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या उपस्थितीत रंगणार ‘सुभेदार गे स्ट हाऊस’चा २५ वा प्रयोग!

 नटश्रेष्ठ अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या उपस्थितीत रंगणार ‘सुभेदार गे स्ट हाऊस’चा २५ वा प्रयोग!

मुंबई दि १४ : मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा जपणारी नामवंत संस्था ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ गेल्या अनेक दशकांपासून दर्जेदार नाटकांची निर्मिती करत आहे. हीच परंपरा जपत संस्थेने रंगभूमीवर सादर केलेले “सुभेदार गेस्ट हाऊस” हे नाटक सध्या रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात यशस्वी वाटचाल करत आहे.

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या नाटकाचा २५ वा (रौप्यमहोत्सवी) प्रयोग अत्यंत दिमाखात सादर होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीचे ‘सम्राट’ म्हणून ज्यांचा उल्लेख आदराने केला जातो, असे नटश्रेष्ठ अशोक सराफ आणि आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या निवेदिता सराफ, या विशेष रौप्यमहोत्सवी प्रयोगासाठी ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून उपस्थित राहणार आहेत.

प्रयोगाचा तपशील:

दिनांक: गुरुवार, १९ मार्च २०२६ (गुढीपाडवा)

वेळ: सकाळी ११.०० वाजता

स्थळ: दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व), मुंबई.

याच सुवर्णक्षणाचे औचित्य साधून, संस्थेच्या वैभवशाली परंपरेला आधुनिकतेची जोड देण्यासाठी ‘गोमंत तरंग’ हे नवीन ऑनलाईन (Online) त्रैमासिक सुरू करण्यात येणार आहे. या डिजिटल माध्यमातून सभासद आणि हितचिंतक आता संस्थेशी अधिक जवळून जोडले जाणार आहेत. सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा हा सुरेख संगम अनुभवण्यासाठी रसिकांनी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’चे सेक्रेटरी जितेश सावंत यांनी केले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *