उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आता या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री
मुंबई, दि. ३ : दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण तसेच अल्पसंख्य विकास, औकाफ ही खाती देण्यात आली आहेत.मात्र अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थखाते मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वत:कडेच ठेवले आहे. अजित पवारांकडे असलेल्या दोन महत्वाच्या जबाबदाऱ्या सुनेत्रा पवार यांच्याकडे कायम ठेवण्यात आल्या आहेत. त्यातील एक म्हणजे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे यापुढे ही सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहील. तर पुण्या प्रमाणे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सुनेत्रा पवारच सांभाळणार आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहे. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी याआधी चंद्रकांत पाटील हे आग्रही होते.
SL/ML/SL