गिग कामगारांनाही आता सामाजिक सुरक्षा

 गिग कामगारांनाही आता सामाजिक सुरक्षा

मुंबई दि २८ : राज्यातील विविध ऍप अर्थात स्वीगी, ओला, उबेर, झोमॅटो सारख्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारने संहिता लागू केली आहे, त्यानुसार राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन करण्यात येणार आहे अशी माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत दिली.याबाबतचा मूळ प्रश्न हेमंत ओगले यांनी उपस्थित केला होता त्यावर अतुल भातखळकर यांनी उपप्रश्न विचारला.

केंद्र सरकारच्या या मंडळाच्या माध्यमातून अशा कामगारांना आरोग्य, विमा, कुटुंब कल्याण आदी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, राज्य सरकारांनीही याचं पालन करायचं आहे अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत असं मंत्री फुंडकर यांनी सांगितलं.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *