अभिजित चव्हाण यांची शिवसेना सहकार सेलच्या दक्षिण मुंबई विभाग प्रमुख पदी निवड.
मुंबई, दि ९
शिवसेना मुख्यनेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे आणि खासदार आनंदराव अडसूळ सहकार सेना अध्यक्ष यांच्या आदेशाने सहकार सेनेच्या दक्षिण मुंबई विभागप्रमुख पदी अभिषेक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. चव्हाण यांनी सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्य केले असून त्यांचा तळागाळातील सामान्य नागरिकांपर्यंत जनसंपर्क आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हे पद दिले असल्याची माहिती मिळते.
आपला विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. कुलाबा,मुंबादेवी, मलबार हिल, शिवडी,वरळी, भायखळा विधानसभा संघटनेला अधिक सक्षम करण्यासाठी, प्रत्येक सहकार शिवसैनिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या हिंदुत्व विचारधारेसाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन अशी माहिती अभिजित चव्हाण यांनी दिली.KK/ML/MS