फसवणूक रोखण्यासाठी RBI देणार OTP विना व्यवहाराची सुविधा
नवी दिल्ली, दि. ३ : ग्राहकांना सायबर फ्रॉड करणाऱ्यापासून वाचवण्यासाठी RBI बँक आणि टेलिकॉम कंपन्यांच्या सहकार्याने एक नवीन तंत्रज्ञान घेऊन येत आहे. यामुळे एखादा सायबर ठग जर फसवणूक आणि सिम क्लोनिंगचा प्रयत्न करत असेल तर पेमेंट तत्काळ थांबेल. ग्राहकांचा पैसा सुरक्षित राहिल.
Online Payment करताना OTP ची प्रतिक्षा करणे आणि तो नंबर टाईप केल्यानंतर पुढील प्रक्रिया होणे ही पद्धत आता कालबाह्य होईल. कारण अनेकदा फोन हॅक करून हॅकर्स हे ओटीपी चोरतात आणि बँकेतील रक्कम काढून घेतात. त्यामुळे ओटीपीचा व्यवहारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याप्रकाराला आळा घालण्यासाठी काही खासगी बँका आणि दूरसंचार कंपन्यांची बैठक झाली होती. त्यात एसएमएस (SMS) या पारंपारिक ओटीपी सिस्टिमद्वारे होणारी प्रक्रिया थांबवण्याचे ठरले तर सायलेंट ऑथिन्टिकेशन नावाची एक नवी प्रणाली आणण्याचे ठरले. ही प्रणाली पूर्वीच्या पद्धतीपेक्षा अधिक जलद आणि सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येत आहे. डिजिटल पेमेंटसाठी ही नवीन प्रणाली फायदेशीर मानली जात आहे.
मोबाईलवर विना OTP बँकिंग संबंधीचे कामकाज पूर्ण करण्यासाठी सायलेंट ऑथिन्टेकशन प्रणाली वापरली जाईल. ही बँकग्राऊंड सुरक्षा प्रणाली आहे. यामध्ये ज्या काही टेलिकॉम कंपन्या आहेत, त्या रिअल टाईम माहिती शेअर करतील आणि पुढील व्यवहार प्रक्रिया पार पडेल. बँकिंग ॲप वापर असाल तर नवीन प्रणाली त्या मोबाईल मधील सिम कार्ड आणि ई-मेलची लागलीच पडताळणी करेल. त्यामुळे मोबाईल हॅक झाल्याचे लक्षात येईल आणि डिजिटल पेमेंट होणार नाही
SL/ML/SL