RBI बदलणार किसान क्रेडीट कार्डसाठीचे नियम
मुंबई, दि. ११ : देशातील शेतकर्यांना जलद आणि सहज कर्ज सुविधा देण्यासाठी RBI ने किसान क्रेडिट कार्ड योजनेत मोठा बदल करणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक कर्ज मिळण्याची शक्यता आहे. तसेच परतफेडीचा कालावधी सुद्धा अधिक असण्याची शक्यता आहे. RBI आता बँकांना इंटीग्रेटेड आणि अपडेटेड मार्गदर्शक सूचना देणार आहे. त्यामुळे कृषी कर्जाचे स्वरुप, मंजूरी आणि वापर याची माहिती समोर येईल.
- सर्वात महत्त्वाच्या प्रस्तावांपैकी KCC चा कालावधी सहा वर्षांपर्यंत वाढवण्याचा आहे. म्हणजेच शेतकरी आता क्रेडिट कार्डअंतर्गत मिळणारे कर्ज हे दीर्घ कालावधीसाठी वापरतील आणि परतफेड करण्यासाठी त्यांना मोठा कालावधी मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती आणि त्याच्याशी संबंधित आर्थिक योजना सोप्या होतील. हंगामानुसार शेतकऱ्यांना परतफेड करणे सोपे होईल.
- कर्ज पुरवठा आणि मर्यादा बदलणार आहे. शेतकऱ्यांच्या Scale of Finance सोबत कर्ज मर्यादा जोडण्याचा RBI प्रयत्न आहे.
- कृषी आवजारे, आधुनिक कृषी उपकरणं, स्मार्ट कृषी उपकरणं आणि इतर कृषी औद्योगिक आवजारे आता किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करण्याचा प्रस्ताव समोर येणार आहे.
SL/ML/SL