RBI या ग्राहकांना देणार 25 हजार रुपयांपर्यतची भरपाई

 RBI या ग्राहकांना देणार 25 हजार रुपयांपर्यतची भरपाई

मुंबई, दि. ७ : डिजिटल फ्रॉडमुळे धास्तावलेल्या ग्राहकांना काहीसा दिलासा देणारा निर्णय RBI ने घेतला आहे. डिजिटल फसवणुकीचा बळी ठरलेल्या बँक ग्राहकांना आता 25 हजार रुपयांपर्यतची भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केली. विशेष म्हणजे, ग्राहकाने चुकून आपला OTP शेअर केला असेल, तरीही ही भरपाई मिळणार आहे. RBI कडील 85 हजार कोटी रुपयांच्या डीईए फंडातून ही रक्कम दिली जाणार आहे. अर्थातच 25 हजार रुपयांपर्यतची भरपाई मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आणि नियम घालून देण्यात आले आहेत.

  • ही भरपाई ग्राहकाला आयुष्यात फक्त एकदाच मिळू शकेल.
  • एकूण डिजिटल फसवणुकीपैकी दोन-तृतीयांश गुन्हे 50 हजार रुपयांच्या आतील आहेत. अशा छोट्या रकमांच्या व्यवहारांना या निर्णयाचा जास्त फायदा होईल. मात्र, ग्राहकाचा कोणताही गैरहेतू नसावा, अशी अट त्यात आहे.
  • फसवणुकीच्या एकूण रकमेपैकी 15 % रक्कम ग्राहकाला स्वतः सोसावी लागेल. उर्वरित रक्कम, कमाल 25 हजारांपर्यंत आरबीआय देईल, असं सांगण्यात आलं आहे.
  • फसवणूक रोखण्यासाठी आरबीआय लवकरच अतिरिक्त सुरक्षा साधने आणणार असल्याचं मल्होत्रा यांनी सांगितले. यामध्ये लाभार्थीच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी काही कालावधीची मर्यादा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष पडताळणी प्रक्रियेचा समावेश असेल.

दरवर्षी यूपीआय फ्रॉड, डिजिटल अरनेस्टबरोबर फिशिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करुन 22 लाख भारतीयांना गंडा घालून कोट्यवधी रुपये लुबडले जातात.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *