या देशात पेट्रोलचा दर अवघा दीड रुपये लिटर

 या देशात पेट्रोलचा दर अवघा दीड रुपये लिटर

मुंबई, दि. ४ : अमेरिकेने आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर तेहरानकडून तीव्र प्रत्युत्तर दिले गेले असून संघर्षाचा विस्तार संपूर्ण पश्चिम आशियात झाला आहे. या कारवाईमुळे संयुक्त अरब अमिरात, कतार, बहरीन, जॉर्डन आणि इराकमधील ठिकाणे लक्ष्य करण्यात आली आहेत. परिणामी, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे, ज्यामुळे अनेक कंपन्यांनी कच्च्या तेलाची वाहतूक तात्पुरती थांबवली आहे. या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात तेलाच्या किंमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली असली तरीही इराणमध्ये पेट्रोलचा दर अवघा दीड रुपये लिटर इतका स्वस्त आहे, इथे पाण्यापेक्षाही पेट्रोल स्वस्त मिळतं.

इराणमधील सरकारने तेथील नागरिकांना इंधनावर प्रचंड मोठ्या प्रमाणात सबसीडी दिली आहे. इंधन हे आपल्याच जमिनीवरच प्रोडक्ट असल्यामुळे त्याचा आपल्या नागरिकांना फायदा व्हायला पाहिजे असा इराणी सरकारचा विचार असल्यामुळे तेथील नागरिकांना इंधनावर प्रचंड प्रमाणात सबसिडी दिली जाते, तसेच इराणकडे प्रचंड प्रमाणात कच्च्या तेलाचे साठे आहेत, हे देखील त्यामागचं एक मोठं कारण आहे.

दरम्यान भारतातील काही शहरांमध्ये तर पेट्रोल, डिझेल महागणार असल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर लोकांनी पेट्रोलपंपांवर प्रचंड गर्दी केल्याचं देखील चित्र पहायला मिळात आहे. आपल्याकडे सध्या २५ दिवसांचा इंधनसाठा शिल्लक असल्याची माहिती भारत सरकारने दिली आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *