शरद पवारांची तब्येत बिघडली; उपचारासाठी रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल

 शरद पवारांची तब्येत बिघडली; उपचारासाठी रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल

पुणे दि ९ : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने शरद पवार हे उपचारासाठी पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झाले आहेत. तिथे त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. रूबी हॉल क्लिनिकचे ज्येष्ठ डॉक्टर डॉ. सायमन ग्रँट हे शरद पवार यांच्यावर उपचार करणार आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे. पवार यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय अपडेटची प्रतीक्षा आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *