अयोध्येत नॉनव्हेजच्या डिलिव्हरीवर बंदी
अयोध्या, दि. ९ : अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि पंचकोशी परिक्रमा मार्गाच्या आसपास मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश ऑनलाइन अन्न वितरण करणाऱ्या कंपन्यांनाही लागू करण्यात आला आहे. या संदर्भात हॉटेल, होम स्टे आणि ऑनलाइन अन्न वितरण करणाऱ्या कंपन्यांना अवगत करण्यात आले आहे. त्यांना इशारा देण्यात आला आहे. उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे.
या आदेशानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक या आदेशाच्या बाजूने तर काही लोक विरोधात उभे राहिले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांना काय खायचे आणि काय नाही, हे ठरवण्याचा अधिकार दुसऱ्या कोणाला नाही, फक्त त्यांनाच आहे. तर अनेक लोक या आदेशाचे स्वागत करत आहेत.
8 जानेवारी रोजी हॉटेल, गेस्ट हाऊस, होम स्टे आणि ऑनलाइन अन्न डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांना आदेशाची माहिती देण्यात आली आहे. नियम मोडल्यास हॉटेल मालक आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल. या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जाईल. याचे निरीक्षण केले जाईल. गरज पडल्यास कारवाई केली जाईल.
माजी आयपीएस अधिकारी आचार्य किशोर कुणाल यांच्या ‘अयोध्या रिव्हिजिटेड’ या पुस्तकात ब्रिटिश काळातच अयोध्येत नॉनव्हेजची विक्री आणि सेवनावर बंदी घालण्यात आली होती. त्याच आदेशाच्या आधारावर तत्कालीन सिटी बोर्ड फैजाबादने ही बंदी लागू केली होती, जी आजही लागू असून याला कधीही आव्हान देण्यात आलेल्याची माहिती नाही.
SL/ML/SL