मुंबईतले पहिले Gen -Z पोस्ट ऑफिस

 मुंबईतले पहिले Gen -Z पोस्ट ऑफिस

मुंबई, दि. १७ : भारतीय टपाल विभाग मुंबईतले पहिले जेन झी पोस्ट ऑफिस (Gen-Z Post Office) (टपाल कार्यालय) आयआयटी मुंबई इथे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या जेन झी पोस्ट ऑफिसचे उद्घाटन १८ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयआयटी मुंबईच्या परिसरात होणार आहे. हा उपक्रम टपाल विभागाच्या आधुनिकीकरण आणि युवा पिढीशी अधिक संलग्नपणे जोडले जाण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जाणार आहे.

भारतीय टपाल सेवेच्या एका नवीन परिवर्तनकारी दृष्टिकोनाशी अनुरूप असलेले हे जेन झी टपाल कार्यालय विशेषतः तरुण मंडळी, विद्यार्थी आणि डिजिटल युगातील लोकांसाठी तयार केलेल्या टपाल सेवांसाठी एक नवीन आणि समकालीन दृष्टिकोन यामुळे सादर केला जाणार आहे.

या आधी दिल्ली, केरळ, गुजरात, बिहार आणि आंध्र प्रदेशमध्ये अशाच प्रकारच्या टपाल कार्यालयांच्या यशस्वी प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानंतर आता मुंबईत देखील हा शुभारंभ देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरणार आहे. देशभरात विस्तार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

या जेन झीच्या टपाल कार्यालयाची वैशिष्ट्ये

१. मोफत वाय-फाय सुविधा देखील याठिकाणी असणार आहे.
२. कॅफेटेरिया-शैलीतील बैठक व्यवस्था आणि एक छोटे वाचनालय देखील असणार आहे.
३. समर्पित संगीत कक्षसुद्धा या ठिकाणी असेल.
४. निवडक टपाल तिकीट संग्रह संबंधित पूरक वस्तूचा पुरवठा सुद्धा होणार आहे.
५. पार्सल आणि लॉजिस्टिक्स सेवांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘पार्सल ज्ञान पोस्ट’.
६. पूर्णपणे डिजिटल, क्यूआर-आधारित सेवा वितरण.
७. आधार नोंदणी आणि अद्ययावत करण्याची सुविधा.
८. टपाल कार्यालय बचत बँक योजनेचे मूल्यांकन आणि मार्गदर्शन.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *