NEET-PG पात्रता निकषांत मोठे बदल

 NEET-PG पात्रता निकषांत मोठे बदल

मुंबई, दि. ९ : NEET-PG पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पात्रता निकषांमध्ये अभूतपूर्व कपात करण्यात आली असून, त्यामुळे अत्यल्प किंवा अगदी शून्य व Negative गुण मिळवणाऱ्या उमेदवारांनाही प्रवेश मिळत आहे. रोहतक येथे MS Orthopaedics शाखेत ८०० पैकी फक्त ४ गुणांवर प्रवेश मिळाल्याचे उदाहरण समोर आले आहे, तर दिल्लीतील नामांकित महाविद्यालयात Obstetrics & Gynaecology शाखेत ४४ गुणांवर प्रवेश मिळाला आहे. यामुळे वैद्यकीय समुदायात तीव्र चिंता व्यक्त होत असून, शस्त्रक्रिया व क्लिनिकल शाखांमध्ये अशा प्रकारे प्रवेश मिळणे रुग्णसुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते, असे वरिष्ठ डॉक्टरांचे मत आहे.

सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टरांनी दाखल केलेल्या याचिकेत हा निर्णय असंवैधानिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, NMC व NBEMS यांना नोटीस बजावली असून पुढील सुनावणी ७ फेब्रुवारीला होणार आहे. सरकारचे म्हणणे आहे की रिक्त जागा भरणे हा मुख्य उद्देश असून उमेदवाराची योग्यता प्रशिक्षण व Exit Exam मधून सिद्ध होईल. मात्र तज्ज्ञांचे मत आहे की केवळ जागा भरण्यासाठी गुणवत्तेचा बळी देणे आत्मघातकी ठरू शकते.

या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावर व जागतिक विश्वासार्हतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्राध्यापकांनी सांगितले की अत्यल्प गुणांवर प्रवेश मिळवणारे विद्यार्थी मूलभूत ज्ञान व क्लिनिकल कौशल्यांमध्ये मागे असतात, तसेच शिस्तीचा अभावही दिसतो. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता व रुग्णसुरक्षा गंभीरपणे धोक्यात येऊ शकते, असा इशारा वैद्यकीय समुदायाने दिला आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *