मशीद बंदर येथील खोदकामामुळे रेल्वे प्रवासी हैराण

 मशीद बंदर येथील खोदकामामुळे रेल्वे प्रवासी हैराण

मुंबई, 3
मशीद बंदर पश्चिम येथील रेल्वे स्टेशन लगत मोठ्या प्रमाणात रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता खोदून ठेवलेला आहे. मजेत बंद रेल्वे स्थानकावरून पश्चिमेकडे पायऱ्यांवरून खाली उतरताना होत कामाचा अंदाज न आल्याने अनेक रेल्वे प्रवासी पडून जखमी होत आहेत. मजीत बंदर येथील रेल्वे पुलावरून खाली उतरताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे त्यामुळे पायरी आणि खोदकाम यामध्ये आंतर जास्त असल्याने रेल्वे प्रवासी या ठिकाणी पाय घासून पडत आहे. हलदी एका वृद्ध महिलेला पायऱ्याचा आणि या रस्त्याचा अंदाज न आल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना थोडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मजीत बंदर परिसरामध्ये अनेक मोठे मोठे खाजगी आणि सार्वजनिक कार्यालयात आहेत. त्याचप्रमाणे अनेक होलसेल चे मार्केट देखील मशीद बंदर परिसरामध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची याचा सुरू असते. परंतु या रस्त्याचे खोदकामाचा त्यांना महात्मा सहन करावा लागत आहे. तरी या ठिकाणी रस्त्याचे खोदकाम त्वरित बंद करून रस्ता पूर्ववत करावा अशी मागणी स्थानिक रहिवासी दुकानदार आणि पादचारी करत आहेत.
मी रोज याच पदाचारी पुलावरून माझ्या मुलाला शाळेत शाळेत घेऊन जात असते. परंतु गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी रस्त्याचे खोदकाम केल्यामुळे मला या पदाचारी पुलावरून खाली उतरणे फार अवघड झालेले आहे. कधी पाय घसरून अपघात होईल हे काय सांगता येत नाही. कधी हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी दीपिका राणे ही महिला करत आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *