अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कपाशीला 8 हजारापर्यंत दर

 अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कपाशीला 8 हजारापर्यंत दर

अकोला दि ८ : विदर्भातील कपाशीची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कपाशीला प्रतिक्विंटल 8 हजारांपर्यंत दर मिळत असून शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुलढाणा अकोला अमरावती व मध्यप्रदेशातील कपाशी विक्रीसाठी येत असते यावेळी बाजार समितीच्या तुलनेने खाजगी विक्रेत्यांकडेही कपाशीला चांगला दर मिळत असल्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या हमीदरानुसार भारतीय कापूस महामंडळामार्फत अकोट मध्ये सुरू असलेल्या कापूस खरेदी केंद्र सोबतच खाजगी विक्रेत्यांकडेही शेतकऱ्यांकडून कपाशीची विक्री होत आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *